Post Office Scheme : पोस्टाची हटके स्कीम; गुंतवणूकदारांना प्रतिमहिना मिळणार 9,250 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Post Office Scheme) अनेक सर्वसामान्य लोक सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणुक योजनांच्या शोधात असतात. अशा योजना जोखीममुक्त परतावा देत असतील तर विशेष पसंत केल्या जातात. कारण नियमित खर्च आणि मासिक पगारावर घर चालवताना होणारी तारेवरची कसरत आणि त्यामधून केलेली ही गुंतवणूक पुढे जाऊन कुठेतरी आर्थिक सुरक्षा प्रदान करणार आहे, हे त्यांना ठाऊक असते. गेल्या काही काळात पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ग्राहकांना सोयी सुविधा प्रदान करता येतील अशा अनेक योजना सादर केल्या गेल्या.

आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबाबत माहिती घेणार आहोत. जिच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मासिक उत्पन्न मिळवता येईल. मुख्य म्हणजे या योजनेत तुमच्या उत्पन्नावर दरमहा ९ हजार रुपये तरी हमखास कमाई होणार हे निश्चित आहे. आता ते कसे? हे जाणून घेऊ.

पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (Post Office Scheme)

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक योजना सादर केल्या गेल्या. ज्यांच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. यामध्ये काही योजना मासिक उत्पन्न योजना आहेत. आपण ज्या योजनेबद्दल बोलत आहोत तीदेखील पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजनाचं आहे. या योजनेतून तुम्हाला दरमहा हमी उत्पन्न मिळते. मुख्य म्हणजे या योजनेमध्ये कोणतीही व्यक्ती एकट्याने किंवा तिच्या/तिच्या जोडीदारासह संयुक्तपणे खाते उघडू शकते. अधिक माहिती जाणून घेऊया.

दरमहा ९,२५० रुपयांची कमाई

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एखादी व्यक्ती आपल्या वैयक्तिक खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात १५ लाख रुपये जमा करू शकते. या योजनेचा किमान ठेव कालावधी हा ५ वर्षांचा आहे. या कालावधीत दरमहा व्याजाचे पैसे मिळतात. (Post Office Scheme) या योजनेंतर्गत संयुक्त खातेदार १५ लाख रुपये जमा करू शकतो. यावर गुंतवणूकदारास ९,२५० रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न मिळते. तसेच योजनेत ९ लाख रुपये जमा केल्यास प्रतिमहिना ५५०० रुपये व्याज दिले जाते. अर्थात या योजनेत गुंतवणूक केल्यास ५ वर्षांपर्यंत प्रतिमहिना ९,२५० रुपये बंपर उत्पन्न मिळते.

व्याजदर आणि आवश्यक कागदपत्रे

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मुलांच्या नावानेदेखील खाते उघडता येते. शिवाय जास्तीत जास्त ३ व्यक्ती संयुक्तपणे योजनेचे खाते वापरू शकतात. (Post Office Scheme) पोस्ट ऑफिसच्या या योजनेत वार्षिक स्वरूपात ७.४ टक्के इतके व्याज दिले जाते. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. खातेधारकांच्या पत्त्याचा पुरावा, फोटो, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि २ पासपोर्ट आकाराचे फोटो जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावे लागतात.

लॉक इन कालावधी

लक्षात घ्या, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास ५ वर्षाचा लॉकइन कालावधी असतो. महत्वाचे असे की, एकदा या योजनेत खाते उघडल्यानंतर १ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही पैसे काढू शकता. दरम्यान, १ ते ३ वर्षात पैसे काढण्यासाठी एकूण ठेवीतून २ टक्के कपात केली जाईल. तर ३ वर्षांनंतर पैसे काढल्यास १ टक्के कपात केली जाईल. या योजनेतील पूर्ण रक्कम ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या परिपक्वतेनंतर गुंतवणूकदारला प्रदान केली जाईल. (Post Office Scheme)