Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला हजारो रुपये कमवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Post Office Scheme) आत्ताच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र खात्रीशीर आणि विश्वासार्ह पर्यायांमध्ये पोस्टाचा समावेश आहे. कारण आजही भारतातील अनेक नागरिक हे सरकारी योजनांवर आणि पोस्टाच्या योजनांवर डोळे बंद करून विश्वास ठेवतात. भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स खात्यामार्फत ‘इंडिया पोस्ट’ या ब्रॅंड नावाने चालविली जाते. ज्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत कुणीही खाते तयार करून गुंतवणुक सुरु करू शकतो.

पोस्टाकडून कायमच नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. अशातच आज आपण पोस्टाच्या एका अशा योजनेची माहिती घेणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त एका वेळी गुंतवून करून प्रत्येक महिन्याला अगदी घरबसल्या कमाई करू शकणार आहेत. (Post Office Scheme) मुख्य म्हणजे हि योजना केवळ शे दोनशे नव्हे तर हजारो रुपयांचं मंथली इनकम सुरु करून देते. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा एकरकमी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्टाची हि खास योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे. या योजनेचं नाव आहे POMIS. या योजनेत गुंतवणूकदारांना व्याजदरदेखील चांगला दिला जात आहे. सध्या हि योजना ७.४% इतका व्याजदर देते आहे. त्यामुळे एकरकमी गुंतवणूकदारांसाठी POMIS एक उत्तम, सुरक्षित आणि लाभदायी गुंतवणूक योजना आहे.

POMIS योजनेत किती गुंतवणूक करता येईल? (Post Office Scheme)

पोस्ट ऑफिसने एकरकमी गुंतवणूकदारांसाठी सुरु केलेल्या POMIS या योजनेत किमान १००० रुपये ते कमाल ९ लाख रुपये गुंतवणुकीची मर्यादा आहे. तर संयुक्त खात्यांसाठी १५ लाख रुपये कमाल गुंतवणूक मर्यादा आहे.

कालावधी आणि व्याजदर

पोस्टाच्या POMIS या मासिक उत्पन्न योजनेचा कालावधी एकूण ५ वर्षांचा आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक ७.४ टक्के इजा व्याजदर दिला जातो. (Post Office Scheme)

गुंतवणूक कोण करू शकतो?

पोस्टाद्वारे गुंतवणूकदारांसाठी सुरु करण्यात आलेल्या POMIS या योजनेत कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. म्हणजे, वैयक्तिक किंवा संयुक्त खात्याव्यतिरिक्त अल्पवयीन मुलंदेखील या योजनेत गुंतवणूक करून लाभ घेऊ शकतात. फक्त यासाठी योजनेचे नियम वेगळे आहेत, हे लक्षात घेणे महत्वाचे ठरेल.

लाभदायी POMIS योजना

पोस्ट ऑफिसच्या POMIS योजनेत गुंतवणूकदारांना प्रतिमहिना कमाईची संधी दिली जाते. तशी या योजनेत विशिष्ट तरतूद करण्यात आली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार (Post Office Scheme) या योजनेत एकरकमी ५ लाख रुपये जमा करून ७.४ टक्के वार्षिक व्याजावर प्रत्येक महिन्यात ३,०८३ रुपये इतकी कमाई करू शकतो. यानुसार, पूर्ण वर्षात म्हणजेच १२ महिन्यांत ३६,९९६ रुपये इतकी कमाई होईल.

पोस्ट योजनेचे इतर फायदे

पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेचे गुंतवणूकदारांना मोठे फायदे मिळतात. कारण एकतर जोखीममुक्त आणि विश्वासार्ह गुंतवणुकीची हमी. शिवाय पोस्टातील खाते देशभरातील एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहज हस्तांतरित करून दिली जातात. इतकेच नव्हे तर पोस्टात गुंतवणूक केल्यानंतर पैशांची गरज भासल्यास १ वर्षात तुम्ही तुमची सुरुवातीची गुंतवणूक रक्कम काढून शकता. (Post Office Scheme)