पोस्ट ऑफिसची जबरदस्त RD योजना; 100 रुपयांच्या गुंतवणूकीतून लाखो रुपये कमवण्याची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण हळू हळू केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात मोठी गुंतवणूक ठरू शकते. एखाद्या अडीअडचणीच्या काळात हि गुंतवणूक तुमचा आधार ठरत असते. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक दीर्घकाळात फायदेशीर ठरते. याच दृष्टीकोनातून पोस्ट ऑफिसमधील एक विशेष योजना समोर आली आहे, ज्यात दररोज फक्त 100 रुपये गुंतवल्यास पाच वर्षांनंतर तुम्हाला लाखो रुपये मिळतील. तर चला जाणून घेऊया या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजनेबद्दल अधिक माहिती .

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजना

पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक देशातील सर्वात सुरक्षित पर्यायांपैकी एक मानली जाते. रिकरिंग डिपॉझिट (RD) ही योजना दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याचा पर्याय देते, ज्यामुळे नियमित बचत सहज शक्य होते. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असून, त्यासाठी दररोज फक्त 100 रुपये जमा केल्यास तुम्हाला पाच वर्षांनंतर मोठी रक्कम मिळेल.

पाच वर्षांमध्ये लाखोंची कमाई

दररोज 100 रुपये जमा केल्यास महिन्याला 3000 रुपये गुंतवले जातात . या प्रमाणे वर्षाला 36000 रुपये जमा होतील आणि पाच वर्षांत एकूण 180000 रुपये जमा होतील. सध्या पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेवर 6.7% वार्षिक व्याज दिलं जातं, ज्यामुळे पाच वर्षांनंतर तुम्हाला एकूण 217097 रुपये मिळतील. यामध्ये 180000 रुपये मुद्दल तर 34097 रुपये व्याज म्हणून मिळेल. त्यामुळे तुम्हाला अधिक नफा प्राप्त होतो.

कर्जाचा लाभ घेता येणार

या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आरडी खात्यावर तुम्ही गरजेच्या वेळी कर्ज घेऊ शकता. 12 हप्ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खात्यातील जमा रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेता येईल. कर्जाची परतफेड एकदम किंवा हप्त्यांनी करता येते आणि या कर्जावर आरडीच्या व्याजदरापेक्षा 2% जास्त व्याज आकारले जाते. त्याचप्रमाणे जर गरज लागली तर तुम्ही आरडी खाते मुदतीपूर्वी बंद करून पैसे काढू शकता. खाते उघडल्यापासून किमान तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खाते बंद करण्याचा पर्याय आहे, तसेच मुदत संपण्याच्या एक दिवस आधीही पैसे काढता येऊ शकतात. त्यामुळे हि योजना भविष्यातील अडचणींच्या काळात तुमच्या गरजांसाठी लाखोंची मदत होऊ शकते. कमी गुंतवणुकीतून मोठ्या उत्पन्नाची संधी देणारी ही योजना गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.