PPF Vs SIP : PPF की SIP?? खात्रीशीर परताव्यासाठी ‘हा’ पर्याय ठरेल बेस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PPF Vs SIP) आजच्या काळात गुंतवणुकीला मोठे महत्व आहे. सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक भविष्यात मोठा फायदा होतो. त्यामुळे अनेक लोक फायदेशीर योजनांच्या शोधात असतात. दरम्यान, नियमित बचत केलेले पैसे जर वाढवायचे असतील तर अनेकज गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीचे पर्याय शोधतात. यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ आणि सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी या दोन पर्यायांना अधिक पसंती दिली जाते. या योजनांच्या मॅच्युरिटीमध्ये चांगला परतावा मिळतो. मात्र, यांपैकी कोणती योजना अधिक फायदेशीर आहे? यामध्ये कायम कन्फ्युजन असते. हे कन्फ्युजन दूर करायचे असेल तर ही बातमी पूर्ण वाचा.

दीर्घकालीन योजनांमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ आणि सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी या दोन्ही योजना चांगल्या मानल्या जातात. (PPF Vs SIP) यापैकी पीपीएफ ही सरकारी योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. तसेच यातून खात्रीशीर परतावा मिळतो. तर एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असता बाजारात होणाऱ्या चढ उतारानुसार मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम होऊ शकतो.

या योजना जितक्या फायदेशीर तितकी गुंतवणुकीबाबत गुंतागुंत होणे साहजिक आहे. अनेकदा पीपीएफमध्ये गुंतवणूक करु असा विचार करता करता एसआयपी मध्ये का नको? असे वाटते. तर (PPF Vs SIP) या दोन्ही योजनांबाबत आपण माहिती घेऊ. म्हणजे कोणती योजना अधिक फायदेशीर आहे? याचा निष्कर्ष काढणे तुम्हाला सोपे जाईल.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)

पीपीएफमध्ये केवळ ५०० रुपये गुंतवूक खाते उघडता येते. यामध्ये १ वर्षाला कमाल १.५ लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेच्या मॅच्युरिटीचा अवधी किमान १५ वर्षांचा असतो. ज्यामध्ये ७.१% व्याजदर दिला जातो. तसेच जमा रकमेवर चक्रवाढव्याजाचादेखील फायदा मिळतो आणि आयकरातून सूटदेखील मिळते. त्यामुळे या योजनेतील गुंतवणूक देखील फायदेशीर ठरते.

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP)

म्युच्युअल फंडातील एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे मोठे फायद्याचे ठरते. कारण एसआयपीमध्ये गुंतवणुक करताना केवळ १०० रुपयांनी सुरुवात करता येते. (PPF Vs SIP) यामध्ये कमाल गुंतवणूक किती करावी? याची निश्चित मर्यादा नाही. तर मॅच्युरिटीचा कालावधी हा योजनेनुसार भिन्न असतो. त्यामुळे एसआयपीतून मिळणारा परतावा हा निश्चित नसतो. असे असले तरीही या गुंतवणुकीतून सरासरी १२% परतावा मिळतो. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणे नक्कीच फायद्याचे ठरते.

PPF की SIP? (PPF Vs SIP)

पीपीएफ आणि एसआयपी या दोन्ही योजना गुंतवणुकीच्या हिशोबाने चांगल्या असल्या तरी गुंतवणूक नेमकी कशात करावी? याबाबत संभ्रम होतो. आता उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास, गुंतवणूकदाराने PPF तसेच SIP अशा दोन्ही योजनेत दर महिन्याला प्रत्येकी ५ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास दोन्ही खात्यांवर १५ वर्षांनी प्रत्येकी ९ लाख रुपये जमा होतील. आता ते कसे? (PPF Vs SIP) तर पीपीएफमध्ये ७.१% दराने गुंतवणूकदाराला ७,२७, २८४ रुपयांचे व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीनंतर १६,२७,२८४ रुपये इतकी एकूण रक्कम जमा होईल. तसेच एसआयपीमध्ये १२% दराने गुंतवणूकदाराला १५ वर्षानंतर एकूण १६,२२,८८० रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीनंतर २५,२२,८८० रुपये इतकी एकूण रक्कम मिळेल.

आता दोन्ही योजनांबाबत माहिती घेतल्यानंतर तुम्ही अगदी सोप्प्या पद्धतीने ठरवू शकता की तुमचे पैसे तुम्हाला कुठे गुंतवायचे आहेत. (PPF Vs SIP)