‘गोल्डन रोझ, चॉकलेट रॅपर आणि..’; क्षितिजाने दिलं प्रथमेशला रोमँटिक सरप्राईज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी सिनेविश्वाचा दगडू अर्थात प्रेक्षकांचा लाडका प्रथमेश परब लवकरच त्याच्या प्रियसीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथमेश आणि क्षितिजा घोसाळकर यांचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ते लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी व्हेलेंटाईन वीकमध्ये क्षितिजाने प्रथमेशला एक गोड सरप्राईज दिलं आहे. पाहूया हे सरप्राईज काय आहे?

प्रथमेश परबच्या होणाऱ्या बायकोने अर्थात क्षितिजाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ‘गुंतले हृदय हे’ या फोटो सीरिजचे रिक्रिएशन शेअर केले आहे. यातील पहिल्या पोस्टमध्ये तिने काही फोटो शेअर करत लिहिलं आहे कि, ‘ ”गुंतले हृदय हे” 4 वर्षांपूर्वी, “गुंतता हृदय हे” या एका फोटोसेरिज मुळे माझी आणि प्रथमेशची ओळख झाली. त्याला सिरीज आवडली, त्याने मेसेज करून भरभरून कौतुक केलं आणि पुढे आमचं हळू हळू बोलणं सुरू झालं. बरं एरवी couple pre weddings वगैरे केलं जातं, off course आम्ही पण करणार आहोत. पण ज्या फोटोशूटमुळे आमच्या प्रेमाची सुरुवात झाली, आज तिचं series recreate करून प्रथमेशला dedicate करावीशी वाटली. म्हणजे duet photoshoot असतंच पण आपल्या पार्टनरला dedicate करणारं, त्याच्या विषयी प्रेम व्यक्त करणारं solo pre wedding करायला काय बरं हरकत आहे? मग ठरवलं, करूया की, फक्त यावेळी love story आपली, # Realवाली’.

‘बरं जुन्या सिरिजमध्ये होती 70 व्या शतकातील love story आणि अगदीच वेगळा विषय! त्याचा आमच्या love story शी तसा काहीच संबंध नाही. पण जरी आमची ओळख virtually झाली तरीही आम्ही दोघेही बऱ्यापैकी old school types चं आहोत. या फोटो मधील पत्रासारखी, अनेक पत्र मी त्याच्यासाठी लिहिली. हस्ताक्षर छान यावं म्हणून खाडाखोड केलेली अनेक पत्रं, लिहिताना शाईने झालेली काळी निळी बोटं, कधी कधी लिहिता लिहिता आनंदाश्रूनीं किंवा त्याच्या आठवणींनी, डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंनी हळूच पुसलेले शब्द, माझ्या wallet मध्ये त्याचा नेहमी असणारा passport size photo (जो या पत्रामध्येही आहे)….अशा एक ना अनेक आठवणींनी हृदयाची कुपी पुन्हा एकदा सुगंधित झाली’.

यानंतर आणखी काही फोटोंसोबत तिने दुसरी पोस्ट शेअर केली. त्यामद्ये मागील पोस्टची पुढील बाजू लिहिताना ती म्हणतेय कि, ‘प्रथमेश आणि माझ्या आयुष्यातील खूप मौल्यवान आठवणी या डायरीमध्ये आहेत.# आठवणींचे_ Hasgtags म्हणतो आम्ही त्यांना! आमची पहिली भेट, त्याने दिलेलं पहिलं गिफ्ट, पहिल्यांदा एकत्र पाहिलेला सिनेमा….सगळ्याचं # पहिल्या_वहिल्या आठवणींचा कोलाज शब्द रुपात बंदिस्त केला आहे. त्याच्यासाठी लिहिलेल्या कविता, पत्र, captions, त्याच्यासाठी लिहिलेली चारोळी आणि त्यातून उमललेल्या भावना, शब्दांनी किती छान व्यक्त करता येतात बरं। आज डायरी वाचत असताना, Destiny चं खूप कौतुक वाटलं. बघता-बघता 4 वर्षे झाली पण!!!! तू दिलेलं golden rose किंवा “हे चॉकलेट कदाचित तुझ्याएवढं गोड नसेल, पण तरीही गोड मानून घे”, असे म्हणत त्याने पहिल्यांदा दिलेल्या चॉकलेटच कव्हर, चॉकलेटच्या गोडव्यापेक्षाही,आज जास्त गोड वाटतय! बाकी पुढील पोस्टमध्ये…’

यानंतर तिसऱ्या पोस्टमध्ये आणखी काही फोटो शेअर करत क्षितिजाने लिहिलं, ‘कातर वेळ ही फार कमाल असते. मावळतीस निघालेला सूर्य, त्याच्या विविध रंगछटांनी मनमोहक दिसणारं आकाश, हवेतील मंद गारवा अन निसर्ग आपल्यासोबत साधत असलेलं अलवार हितगुज! बरं अशातच जर आसपास पाणी असेल तर मात्र हा निसर्ग तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रेमात पाडतो. Pub, clubs, मोठमोठे restaurants यात कधीही न रमणारे आम्ही दोघे, अशा ठिकाणी मात्र तासनतास रमतो. जर आमच्यापैकी कोणालाही यायला उशीर झाला तरीही एकमेकांची वाट बघण्यात आम्ही रममाण होतो. प्रथमेश तुझी वाट बघायला मला नेहमीच आवडते…. म्हणूनच..
येणारच तू भेटण्यास
तर जिवलग प्रियकर होऊन ये,
धूसर स्वप्नी स्वरासारखा
उत्कट आतुर होऊन ये…
पापणीतून स्वप्न उतरते तसाच अलगद अवचित ये,
जगा न कळता… मला न कळता… स्वतः तुलाही न कळता नकळत ये…
कारण… भूतकाळातील आपल्या आठवणींमध्ये, वर्तमानातील सवयींमध्ये अन भविष्यातील स्वप्नांमध्ये…
माझे आणि तुझे….”गुंतले हृदय हे”!’

अशा सलग ३ पोस्ट शेअर करून क्षितिजने प्रथमेशला अत्यंत गोड आणि रोमँटिक सरप्राईज दिले आहे. यावर कमेंट करताना भारावलेला प्रथमेश म्हणाला कि, ‘You are full of Surprises…खूप प्रेम…किती भारी वाटतंय हे बघून सिनेमातल्या छान फ्लॅशबॅक सारखं.. प्रेमात थोडं old school असणं भारी असतं.. हे खरंय…मी जाईपर्यंत तुझं थांबणं शेवटपर्यंत राहू दे….आय लव्ह यू…किती छान लिहितेस तू….इतकं भारी वाटतंय….अजून एकदा प्रेमात पडलास मला…खूप प्रेम…’.