Prathamesh Parab Marriage : फॉरेव्हरसाठी लॉक!! प्रथमेश – क्षितिजा अडकले लग्नबंधनात; फोटो आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prathamesh Parab Marriage) गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचा लाडका दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर आज प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिज घोसाळकरसोबत लग्न बंधनात अडकला आहे. या वर्षी व्हेलेंटाईन डे दिवशी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथमेश आणि क्षितिजाचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. यानंतर बरोबर १० दिवसांनी आज २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथमेश आणि क्षितिजा अधिकृतपणे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. नुकतेच त्यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(Prathamesh Parab Marriage)आज प्रथमेश आणि क्षितीजाने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आपल्या लग्नाचे फोटो स्वतः अभिनेता प्रथमेश परबने इंस्टाग्राम हँडलवर हेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना प्रथमेश परबने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अखेर लॉकडाऊन लव्हस्टोरीचे हृदय कायमसाठी लॉक झाले’. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये प्रथमेश आणि क्षितिजा दोघेही सुंदर अन आनंदी दिसत आहेत. त्यांचा पारंपरिक लूक अत्यंत लक्षवेधी ठरतो आहे.

लग्नाच्या विधींसाठी क्षितिजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. ज्यावर तिने गुलाबी रंगाची शाल घेतली होती. तर प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा आणि बायकोला मॅचिंग म्हणून गुलाबी रंगाचं धोतर परिधान केलं होतं. याशिवाय प्रथमेशने गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा फेटासुद्धा बांधला होता. (Prathamesh Parab Marriage) प्रथमेशच्या लग्नाची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना, कुटूंबियांना आणि सिने विश्वातील अनेक मंडळींना होती. अखेर आज प्रथमेश लग्न बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असून नेटकरी, कलाकार मंडळी त्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अभिनेता प्रथमेश परबची बायको म्हणजेच क्षितिजा घोसाळकर ही एक फॅशन मॉडेल आहे. शिवाय क्षितीजाला लिखाणाची प्रचंड आवड आहे. तसेच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये क्षितिजा कार्यरत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोशूटमूळे प्रथमेश- क्षितीजाची इंस्टाग्रामवर ओळख झाली. यांनतर त्यांची मैत्री झाली आणि पुढे ते प्रेमात पडले. आता मैत्रीतून खुललेल्या प्रेमाचा लग्नाच्या स्वरूपात एक नवा प्रवास सुरु झाला आहे. (Prathamesh Parab Marriage)