बाईपण भारी देवा ! गर्भवती महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेशाऐवजी साडी नेसण्याची मुभा

0
1
mahila police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना वर्दी घातल्यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. याच त्रासामुळे अनेक महिला पोलिसांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. काही दिवसापूर्वी डीजीपी कार्यालयाने गर्भवती महिलांसाठी गणवेशात सूट देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता, जो प्रलंबित होता. त्याचाच सरकारने पाठपुरावा केला आहे .अखेर , बुधवारी सरकारने गर्भवती महिला पोलिसांना गणवेशाऐवजी साडी नेसण्याची मुभा देणारा शासन निर्णय जाहीर केला आहे . या निर्णयामुळे महिला पोलिस कर्मचाऱ्यांची दिलासा मिळणार आहे.

प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक

गर्भवती महिला पोलिसांना गर्भधारणेचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच साडी नेसण्याची परवानगी दिली जाईल. ही सवलत केवळ गर्भधारणेच्या काळातच लागू असणार आहे, तसेच काही काळ या सुटीचा लाभ घेता येणार आहे. या निर्णयामुळे महिला पोलिसांना त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेता येईल.महिला पोलिसांसाठी हा निर्णय निश्चितच महत्वाचा ठरणार आहे.

आरोग्यावर होणारा परिणाम कमी

गर्भधारणेदरम्यान महिलांना गणवेश आणि बेल्ट घालणे अवघड जात असल्याने त्यांची गैरसोय होते . गर्भवती स्त्रियांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते .बेल्ट घातल्याने पोटावर दाब येतो, ज्यामुळे गर्भावर आणि महिलांच्या तब्येतीवर विपरित परिणाम होऊ शकतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे आता महिला पोलिस कर्मचारी अधिक सुरक्षितपणे आणि आरामात आपली जबाबदारी पार पाडू शकतील. या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम कमी होईल.