तुम्ही देखील एखाद्या संघटित क्षेत्रात काम करत असाल म्हणजे खाजगी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण EPFO लवकरच खासगी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढवण्याच्या तयारीत आहे. याबाबतची फाईल जवळपास तयार झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. औपचारिक चर्चेनंतरच वाढीव पगार जाहीर केला जाईल.. म्हणजेच आता मूळ वेतन १५ हजारांऐवजी २१ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव मंजूर होणे बाकी आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे पैसे EPFO मध्ये अधिक योगदान दिले जातील.
लवकरच निर्णय
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्थ मंत्रालय मूळ वेतनात वाढ करण्याचा विचार करत आहे. एवढेच नाही तर कामगार मंत्रालयाने पगार मर्यादा सध्याच्या 15,000 रुपयांवरून 21,000 रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पगार मर्यादा वाढवल्यास खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. माहितीनुसार, 1 सप्टेंबर 2014 पासून म्हणजेच जवळपास एक दशकापासून EPS साठी पगार मर्यादा 15 हजार रुपये आहे. आता याबाबत मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, ही घोषणा कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
ईपीएफचे योगदान वाढेल
या प्रस्तावानुसार वेतन मर्यादा 15 हजार रुपयांवरून 21 हजार रुपये करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि ईपीएफ योगदान वाढणार आहे. सरकारने प्रस्ताव मंजूर केल्यास पेन्शनच्या रकमेत वाढ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक पैसे मिळतील. याशिवाय पगार मर्यादेत वाढ झाल्याने अधिकाधिक कर्मचारी त्याच्या अखत्यारीत येतील.