हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलोवेरा शेती ही सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. अल्प खर्च, कमी मेहनत आणि अधिक नफा यामुळे अनेक शेतकरी या शेतीकडे वळत आहेत. एलोवेरा एक औषधी वनस्पती आहे, ज्याचा वापर सौंदर्यप्रसाधने, औषधनिर्मिती आणि हेल्थ प्रॉडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे बाजारात याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या शेतीतून तुम्ही मालामाल होऊ शकता. तर चला या शेतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
एलोवेरा शेती कशी करावी –
ही शेती कोरडवाहू भागातही सहज करता येते. एलोवेरासाठी पाण्याचा साठा नसलेली, तसेच धूसर माती सर्वोत्तम मानली जाते. लागवड करताना दोन झाडांमध्ये साधारणपणे दोन फूट अंतर ठेवावे लागते. योग्य काळजी घेतल्यास एलोवेरा झाडांना वर्षातून दोन वेळा कापणी करता येते. कीटकांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करावा. मात्र यामध्ये युरिया किंवा डीएपीचा वापर टाळावा, कारण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
औद्योगिक क्षेत्रात अधिक मागणी –
एलोवेराच्या अनेक प्रजातींपैकी ‘बार्बाडेन्सीस’ (Barbadensis) ही प्रजाती सर्वाधिक फायदेशीर मानली जाते. याच्या पानांमध्ये अधिक जेल असतो, जो जूस आणि सौंदर्यप्रसाधनात वापरला जातो. त्यामुळे या प्रजातीला औद्योगिक क्षेत्रात अधिक मागणी आहे.
पानं विकून लाखोंचा नफा –
एका एकर जमिनीत सुमारे 12000 झाडे लावता येतात. एका झाडाची किंमत साधारणतः 3 रु पर्यंत असते. त्यामुळे लागवडीसाठी सुरुवातीला 40000 पर्यंत खर्च येतो. एका झाडापासून सरासरी 4 किलोपर्यंत पानं मिळतात आणि यांची बाजारात किंमत 7 रु ते 8 रु प्रति किलो असते. यानुसार केवळ पानं विकून लाखोंचा नफा मिळवता येतो. त्याचबरोबर एलोवेराचा जेल काढून तो थेट कंपन्यांना विकल्यास आणखी जास्त कमाई करता येते.
तोट्याची शक्यता कमी –
सुरुवातीला कमी जागेत शेती करून त्यानंतर हळूहळू त्याचा विस्तार करता येतो. एलोवेरा शेतीला प्राण्यांपासून फारसा धोका नसतो, त्यामुळे तोट्याची शक्यता कमी असते. योग्य नियोजन आणि मार्केटिंग केल्यास एलोवेरा शेतीतून लाखो ते कोटींची कमाई करणे सहज शक्य आहे.




