Property At Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर या धार्मिक शहरातील मालमत्तांच्या किमतींबाबत अनेक बातम्या येत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी मॅजिक ब्रिक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अवघ्या 3 महिन्यांत अयोध्येतील मालमत्तेच्या किमती 179 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जी जमीन पाच वर्षांपूर्वी 2019 मध्ये 1000 ते 2000 रुपये प्रति चौरस फूट दराने उपलब्ध होती, ती आज 4 ते 6 हजार रुपये प्रति चौरस फूट आहे. आता राम मंदिराचे लोकार्पण झाले असल्याने आगामी काळात येथील पर्यटन आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत मालमत्तेच्या (Property At Ayodhya) किमती आणखी वाढू शकतात. पण, एवढ्या महागड्या किमतीत जमीन खरेदी करणे इतके सोपे नाही. तथापि, अयोध्येभोवतीचा भविष्यातील विकास लक्षात घेऊन, चांगल्या परताव्यासाठी अजूनही काही क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. जाणून घेऊया तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीचा मंत्र…
अयोध्या जिल्ह्याच्या मुद्रांक आणि नोंदणी विभागानुसार, 2017 ते 2022 पर्यंत मालमत्ता नोंदणीमध्ये 120 टक्के वाढ झाली असून, 2017 मध्ये अयोध्येत एकूण 13,542 मालमत्तांची (Property At Ayodhya) नोंदणी करण्यात आली, तर 2022 मध्ये ही सं’या 20,889 मालमत्तांवर पोहोचली. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी अॅनारॉक समूहाच्या मते, जमिनीचा दर 1,000 ते 2,000 रुपये प्रती चौरस फूट होता, जो आता 4,000 ते 6,000 रुपये प्रती चौरस फूट झाला आहे.
काय सांगतात प्रॉपर्टी एक्सपर्ट ?
रिअल इस्टेट तज्ञ आणि Homents Pvt Ltd चे संस्थापक, प्रदीप मिश्रा म्हणतात की, अयोध्येतील भविष्यातील विकासाच्या दृष्टिकोनातून, अनेक क्षेत्रांमध्ये असलेल्या मालमत्तांमध्ये गुंतवणुकीच्या (Property At Ayodhya) चांगल्या संधी आहेत. विशेषतः, शरयू नदीच्या दोन्ही बाजूला, विमानतळ आणि रेल्वे स्थानकाजवळील भागात आणि अयोध्येला जोडणाऱ्या महत्त्वाच्या शहरांमधील महामार्गावरील मालमत्तेत गुंतवणूक करता येते.
या क्षेत्रांमध्ये संधी
प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येचा 7 प्रमुख शहरांशी थेट संपर्क आहे. लखनौ, वाराणसी, प्रयागराज, गोरखपूर आणि दिल्लीसह प्रमुख शहरांशी मजबूत रेल्वे आणि रस्ते कनेक्टिव्हिटी (Property At Ayodhya) आहे. त्याचवेळी अयोध्या विभागात आंबेडकर नगर, अमेठी, बाराबंकी, अयोध्या आणि सुलतानपूर या 5 जिल्ह्यांचा समावेश आहे, जिथे विकासाच्या अपार शक्यता आहेत.
अयोध्या विकास प्राधिकरणाचे नियोजन (Property At Ayodhya)
अयोध्या विकास प्राधिकरण (ADA) जानेवारी 2024 मध्ये गृहनिर्माण योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. या उपक्रमामुळे अयोध्येच्या विकासात महत्त्वाचे योगदान अपेक्षित आहे. शहरात मालमत्तेचे दर आधीच खूप वाढले असल्याने भविष्यात शहरीकरणामुळे किमती वाढण्याची शक्यता असल्याचे प्रदीप मिश्रा यांनी म्हंटले आहे. त्याच वेळी, सरकारचे नियोजन अयोध्या शहराच्या पलीकडे आसपासच्या भागात विस्तारले आहे, त्यामुळे निवासी मालमत्तेच्या (Property At Ayodhya) किमती वाढण्याची शक्यता वाढली आहे. कालांतराने, इन्फ्रा विकसित होईल. यामुळे घरे आणि जमिनीची मागणी वाढेल, ज्यामुळे गुंतवणूकदारांना वाढत्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी निर्माण होतील.