Pune Metro : महत्वाची बातमी ! पुणे मेट्रोची ‘ही’ सेवा होणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Metro : मुंबई नंतर पुणे हे शहर मोठ्या झपाट्याने विकसित होत आहे. पुण्याच्या विकासात मोठी भर पाडली आहे ती म्हणजे पुणे मेट्रो. अद्याप पुण्यातील सर्व भागात मेट्रो पोहचली नसली तरी लवकरच मेट्रोचा (Pune Metro) विस्तार नियोजित मार्गावर होणार आहे. सध्या काही मार्गावर मेट्रोचा प्रवास सुरु आहे. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र पुणे मेट्रोने एक महत्वाची सुविधा बंद केली आहे. याबाबतची माहिती मेट्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली आहे.

पुणे मेट्रोची ‘ही’ सेवा बंद (Pune Metro)

पुणे मेट्रो मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता परतीचे तिकीट म्हणजेच रिटर्न तिकीट (Pune Metro) काढण्याची सुविधा बंद केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर मेट्रोने प्रवास करत असाल तर ही महत्त्वाची माहिती आज आम्ही तुमच्या सोबत शेअर करत आहोत. मेट्रो कडून दिलेल्या माहितीनुसार एक मार्चपासून प्रवाशांना परतीचे तिकीट काढता येणार नाही.

काय आहे पुणे मेट्रोची पोस्ट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पुणे मेट्रो रेल या अधिकृत अकाउंट (Pune Metro)वरून दिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ” प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना दिनांक 1 मार्च 2024 पासून परतीच्या प्रवासाचे तिकीट काढण्याची सुविधा बंद करण्यात येत आहे याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी ” अशा पद्धतीची पोस्ट पुणे मेट्रो कडून प्रसारित करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार परतीचे तिकिटावरून गोंधळ होत असल्याकारणाने आणि परतीचे तिकीट (Pune Metro) काढणाऱ्यांची संख्या देखील कमी असल्याकारणाने पुणे मेट्रो ने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

दरम्यान या निर्णयानंतर प्रवाशांनी एक्स वर आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत काहींनी या निर्णयाचे स्वागत केलं तर काहींना हा निर्णय चुकीचा वाटतो आहे. एका प्रवाशांनी हा निर्णय चुकीचा असल्याचा म्हंटले आहे. शिवाय “लोकांना उगाचच दोनदा लाईनीत उभा करण्यात काय आनंद मिळणार आहे?” असा सवाल देखील पुणे मेट्रोला (Pune Metro) केला आहे.