Pune Mhada Lottery : सर्वसामान्यांना हक्काची घरे मिळवून देणारे म्हणून म्हाडाकडे पाहिले जाते. पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती आकाशाला भिडल्या असताना म्हाडाकडून कमी किमतीत घरं उपलब्ध करून दिले जातात. म्हाडा (Pune Mhada Lottery) म्हणजे मोठा दिलासा मानला जातो. म्हणूनच म्हाडाच्या सोडतीसाठी अनेक जणांकडून आवर्जून अर्ज पाठवले जातात. म्हाडाची 2024 ची पुणे विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्हाला देखील पुण्यामध्ये घर घ्यायचं असेल आणि म्हाडाद्वारे तुम्ही घर घेऊन इच्छिता आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. म्हाडाने नुकत्याच दिलेल्या जाहिरातीनुसार 4882 घरे पुणे विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या लॉटरीमध्ये (Mhada Pune Lottery) सर्वात स्वस्त घर कुठे आहे आणि त्याची किंमत किती आहे याची माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.
पुणे विभागासाठी म्हाडाची 4882 घर उपलब्ध करून दिली आहेत. ज्यामध्ये पंतप्रधान (Pune Mhada Lottery) आवास योजनेतील घर पंतप्रधान आवास योजना आणि खाजगी शासकीय भागीदारीतील घर, म्हाडा गृहनिर्माण योजना आणि 20% सर्वसमावेशक (Mhada Pune Lottery) गृहनिर्माण योजनेतील घरांचा समावेश आहे.
आता सर्वात स्वस्त घरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्हाडाच्या योजनेनुसार प्रथम येणाऱ्या प्रथम (Pune Mhada Lottery) प्राधान्य या योजनेच्या अंतर्गत विक्रीसाठी असलेल्या घरांमध्ये सर्वात स्वस्त घरांचा समावेश आहे हे गृह प्रकल्प अल्प उत्पन्न घट म्हणजे एलआयसी साठी आहे. सर्वे क्रमांक 1712(भाग ) दिवे पुरंदर इथे एकूण 17 घरांचा समावेश या वर्गामध्ये करण्यात आला आहे. यामधील घरांची अंदाजे किंमत ही 9 लाख 44 हजार 800 रुपये इतके आहे. तर या घरासाठी कार्पेट एरिया म्हणजेच चटई क्षेत्रफळ 29.40 चौरस मीटर इतके आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे याच योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ईडब्ल्यूएस यासाठी घर उपलब्ध करून देण्यात (Pune Mhada Lottery) आली आहेत यामध्ये चाकण महाळुंगे इंगळे फेस 2(PMAY) या घरांची अंदाजित किंमत 1,36,1895 रुपये आहे. या ठिकाणी 32 घर विक्रीसाठी उपलब्ध असून या घरांचे चटई क्षेत्रफळ म्हणजे कार्पेट एरिया 51.59 चौरस मीटर इतका आहे.
20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना
या योजनेत येवलेवाडी येथे 12 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या घरांचे चटई क्षेत्रफळ (चौ.मी.) 43.65 ते 49.49 इतके आहे. तर या घरांची अंदाजित किंमत 13,94,400 ते 15,81000 रुपये इतकी आहे. या योजनेचा (Pune Mhada Lottery) संकेत क्रमांक 798 सी असा असून योजनेचे नाव सद्गुरु रेसिडेन्सी, मे. मा. प्रणाम बिल्डकॉन प्रा. लि., स. नं. 2, हिस्सा नं. 4 / 2 / 2, येवलेवाडी असे आहे. ही घरे 1 बीएचके आहेत.
पुणे म्हाडा लॉटरी 2024 साठी महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्जसाठी नोंदणी – 7 मार्च 2024 (दुपारी 3 वाजल्यापासून) सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात – 8 मार्च 2024 (दुपारी 3 वाजल्यापासून) सुरु झाली आहे. ऑनलाईन पेमेंट स्विकृती – 8 मार्च 2024 (दुपारी 3 वाजल्यापासून) सुरु झाली आहे. तर ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख – 8 एप्रिल 2024 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) असेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2024 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)असेल शिवाय ऑनलाईन पेमेंट अंतिम तारीख – 12 एप्रिल 2024 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) असेल.
तर सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची यादी 24 एप्रिल 2024 सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध केली जाईल. सोडत दिनांक 8 मे 2024 (सकाळी 10 वाजता) असेल
ही सोडत गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, म्हाडा कार्यालय, पुणे येथे पार पडेल,
या वेबसाईटला भेट द्या
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करुन व अनामत रक्कमेचा भरणा करुन म्हाडा पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा. ऑनलाईन अर्ज कसा भरावा?, अर्ज भरण्याची पद्धत, घरांच्या किमती या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी म्हाडा लॉटरी 2024 या लिंकवर क्लिक करुन अधिकृत जाहिरातीची पीडीएफ (Pune MHADA Lottery 2024 notification pdf) फाईल पहावी.