Pune News : देशभरात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. दरम्यान उद्या दिनांक १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्या कारणामुळे उद्या गणेश विसर्जन केले जाणार असून विविध शहरात त्यानिमित्त मिरवणूका काढल्या जातात. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात निघते. ही मिरवणूक पाहण्यासाठी आणि मिरवणुकीत सहभाग घेण्यासाठी मिठी गर्दी होते. विसर्जन मिरवणुकीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकी मध्ये बदल करण्यात आले आहेत. मिरवणूक काळात पुण्यातील काही प्रमुख रस्ते बंद असणार आहेत तर काही ठिकाणी पार्किंगची (Pune News) सोय कशी असेल ? चला जाणून घेऊया…
कुठे कराल पार्किंग? (Pune News)
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान तेरा ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था करण्यात आली असून विसर्जन सोहळ्यानिमित्त 13 ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये शिवाजी आखाडा वाहनतळ मंगळवार पेठ, एस एस पी एम एस मैदान, स. प . महाविद्यालय टिळक रस्ता, पेशवे उद्यान सारसबाग, पाटील प्लाझा मित्र मंडळ, दांडेकर पूल ते गणेश मळा, निलायम चित्रपटगृह, संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय मैदान, जैन हॉस्टेल मैदान, बीएमसीसी रस्ता, मराठवाडा महाविद्यालय ,नदीपात्र ते भिडे पूल या ठिकाणी नागरिकांना वाहन लावण्याची व्यवस्था करण्यात आली (Pune News) आहे.
हे मार्ग असणार बंद (Pune News)
विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने शहरातील काही प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत हे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये लक्ष्मी रोड टिळक रोड सह शहरातील प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. मात्र आपात्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बंद असलेल्या रस्त्यांमध्ये लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, शिवाजी रोड, जंगली महाराज रोड, एफसी रोड, कर्वे रोड, प्रभात रोड (Pune News) या रस्त्यांचा समावेश आहे.
ॲप द्वारे मिळणार विसर्जन मिरवणुकीची माहिती
पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एका ॲपद्वारे मिळू शकेल. गणेश विसर्जनादिवशी ‘माय सेफ पुणे अँप’ द्वारे बंदोबस्त आणि मंडळांची माहिती देखील प्राप्त होणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी जागा, पोलीस मदत केंद्र, पादचारी मार्ग यांची माहिती देखील या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्ग, बंद रस्ते आणि मंडळाच्या मिरवणुकीबाबत (Pune News) सद्यस्थितीची माहिती या ॲप मधून दिली जाणार आहे.