Pune News : महत्वाची बातमी ! पुणे शहरात आजपासून अवजड वाहनांना प्रवेश बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वारंवार होणारे छोटे मोठे अपघात रोखण्याकरिता पुणे शहरात आजपासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय पुणे शहर पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून म्हणजेच शनिवार दिनांक 23 मार्च पासून (Pune News) केली जाणार आहे.

या भागात बंदी (Pune News)

पुणे शहरातून सोलापूर, सातारा, नगर, मुंबई, नाशिक, सासवड, पौड ,आळंदी या रस्त्यांवरून (Pune News) जाणारी जड वाहतूक बंद करण्यात आली असून यामध्ये ट्रक आणि इतर वाहनांनी येताना व जाताना शहरांमधील अन्य मार्गाचा वापर करावा असे वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेश यामध्ये म्हटले आहे. याबाबत पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून X या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट देखील करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 23 मार्च 2024 पासून सकाळी नऊ ते बारा व संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत केली जाणार आहे

या’ मार्गावर असेल प्रवेश बंदी (Pune News)

  • लक्ष्मी रोड – संत कबीर चौक ते टिळक चौक
  • शिवाजी रोड– संत गो बर्वे चौक ते जेधे चौक
  • बाजीराव रोड- पुरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक
  • केळकर रोड– टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक
  • कुमठेकर रोड- टिळक चौक ते शनिवार चौक
  • टिळक रोड– टिळक चौक ते जेधे चौक
  • जंगली महाराज रोड- बर्वे चौक ते खंडोजी बाबा चौक
  • फर्ग्युसन कॉलेज रोड– खंडोजी बाबा चौक ते वीर चाफेकर चौक
  • कर्वे रोड– खंडोजी बाबा चौक ते पौड फाटा
  • महात्मा गांधी रोड- पंडोल आपारमेंट चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक
  • नॉर्थ मेन रोड कोरेगाव पार्क – कोरेगाव पार्क जंक्शन ते ताडी गुप्ता चौक

या बंदी मधून अत्यावश्यक सेवा वाहनांना तसेच सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या (Pune News) बस यांना वगळण्यात आले असून वाहतूकदारांनी बदल केलेल्या नियमाची नोंद घ्यावी असा आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला आहे