Pune News : पुण्याची सद्यस्थिती बघता पुण्यामध्ये अद्यापही कमी अधिक प्रमाणात पावसाची ये – जा सुरुच आहे. आशातच पुण्यात पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून (२९) संप पुकारला आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. त्यामुळे ” आधीच वनवास त्याच अधिक मास ” अशी पुणेकरांची (Pune News) अवस्था झाली आहे.
आज सोमवारपासून सुरु झालेल्या या संपाला शिवसेने देखील पाठिंबा दर्शवला आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे पीएमपीच्या संचलनातील गाड्या कमी झाल्या आहेत त्यामुळे शहरातल्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune News) मिळवून जवळपास 12 लाखांपेक्षा जास्त प्रवासी हे पीएमपीने प्रवास करीत असतात.
मिळालेल्या माहितीनुसार पीएमपी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. यापूर्वी समितीकडून मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मागण्या मान्य नसल्यास (Pune News) सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून याचा फटका शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना बसतो आहे.
काय आहेत मागण्या ? (Pune News)
- सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विना विलंब मिळावी.
- सहा वर्षांपासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करावं.
- कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती द्यावी.
दरम्यान मिळालेला अधिकच्या माहितीनुसार संपाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा (Pune News) प्रयत्न पीएमपी प्रशासनाकडून करण्यात येत असून चर्चेला सुरुवात करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे