Pune News : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची खैर नाही ; पुण्यातल्या चौकाचौकात AI ठेवणार वॉच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : ‘ पुणे तिथे काय उणे ‘ ही उक्ती आपण बऱ्याचदा ऐकली असेल. संपूर्ण देशात सर्वाधिक वाहनांची संख्या पुण्यात आहे. पण पुण्यात ट्रॅफिकची समस्याही मोठी आहे . तासंतास ट्रॅफिकमध्ये पुणेकरांना ताटकळत बसावे लागते. शिवाय वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचीही इथे काही कमी नाही. मात्र आता वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची सुट्टी नाही… कारण आता पुण्यातल्या चौका चौकात ट्राफिक पोलिसांना तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे. त्यामुळे नियम तोडल्यास अवघ्या 5 मिनिटात पावती मिळणार आहे. इथे भाऊ, दादा काही चालणार (Pune News) नाही. असं नक्की काय होणार आहे पुण्यात चला पाहुयात…

AI टेक्नॉलॉजी ठेवणार वॉच (Pune News)

पुण्यातल्या चौका चौकामध्ये वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणाली द्वारे कारवाई करण्यात येणार आहे. तंत्रज्ञान आधारित ही यंत्रणा असणार आहे त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन केलं तर अवघ्या पाचव्या मिनिटाला दंडाची पावती थेट तुमच्या मोबाईलवर फोटोसह मिळणार आहे. त्यासाठी पोलीस ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकीग्नेशन कॅमेरा ची मदत (Pune News) घेणार आहेत.

खरंतर पुणे पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूकही करण्यात येणार आहे. पुण्यातल्या चौका चौकात आधुनिक कॅमेरा द्वारे पुणे पोलिसांची यंत्रणा राबवण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चुकूनही नियम तोडण्याच्या विचारात असाल तर लगेच तुम्ही पकडले जाणार आहात. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने लगेचच तुमच्या दंडाची पावती आणि फोटो देखील मिळणार (Pune News) आहे. त्यामुळे पुण्यात वाहन चालवताना नियमांचे पालन हे करावंच लागणार आहे. अन्यथा दंड भरण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. तसंच जे वाहनधारक वारंवार नियम मोडतात त्यांच्या परवाना रद्द करण्याची सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.