Pune News : पुणेकरांसाठी खुशखबर ! रविवार पासून सुरु होणार विमानतळावरील नवे टर्मिनल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणेकरांना रविवारपासून म्हणजेच 14 जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्या टर्मिनल ची सेवा अनुभवायला मिळणार आहे. पुणे शहरातल्या (Pune News) आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल आता पूर्ण होत असून सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या X (आधीचे ट्विटर) अकाउंट वरून दिली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नवी टर्मिनल सुरू करण्यासाठी अतिरिक्त सीआयएसएफ जवानांची आवश्यकता होती. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्याला तातडीने परवानगी मिळाली असून सीआयएसएफचे जवान पुणे (Pune News) विमानतळावर दाखल झाले आहेत.

222 CISF कर्मचाऱ्यांना मंजुरी (Pune News)

मोहोळ यांनी माहिती देताना सांगितले की , “पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल या रविवारपासून कार्यान्वित होणार आहे! CISF कर्मचाऱ्यांच्या आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन टर्मिनल 14 जुलै, रविवारपासून नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. त्यांनी नमूद केले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन टर्मिनलचे कामकाज सुरू (Pune News) करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त 222 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कर्मचाऱ्यांना मंजुरी दिली आहे.यावर्षी मार्चमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 423 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधलेल्या 51,595 चौरस मीटर टर्मिनलचे लोकार्पण केले. तरीही, अधिक CISF कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण झाली नाही, ज्यामुळे त्याचे कार्यान्वित होण्यास विलंब झाला.

मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास (Pune News)

दरम्यान टर्मिनल कार्यान्वित करताना नव्या टर्मिनल च्या पहिल्या प्रवाशाला केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात येणार आहेत. एअर इंडियाच्या प्रवाशाला 14 जुलै रोजी दुपारी एक वाजता बोर्डिंग पास देत नवे टर्मिनल कार्यान्वित केले जाणार आहे. टर्मिनल 2 च्या नवीन जोडणीमुळे या विमानतळाची प्रतिवर्षी सोळा दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची क्षमता (Pune News) असेल. एक देशांतर्गत उड्डाणांसाठी आणि दुसरी आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी.