Pune News : पुण्यात आता होणार तिसरी महानगरपालिका ; पहा कोणत्या भागांचा होणार समावेश ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : मागच्या काही वर्षात पुणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. तसेच पुण्याची लोकसंख्याही वाढली आहे. कारण पुण्यात आता तिसरी महानगरपालिका होणार आहे. पुणे शहराच्या (Pune News) विस्तारात आता आणखी गावांचा समावेश करणे शक्य होणार नाही म्हणूनच पुणे , पिंपरी -चिंचवड आणि त्यानंतर आता तिसरी महापालिका तयार होणार आहे.

चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि राजगुरू नगरपरिषदेच्या हद्दीतील भागाबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील गावांचा (Pune News) समावेश करुन नवीन महापालिका निर्माण केली जाणार आहे. याबाबतच्या हलचाली सुरु झाल्या असून संबंधित विषयासंदर्भात अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला असून याबद्दलच कामही सुरु झालं आहे.

चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करण्याबाबतची मागणी होत आहे. चाकण, आळंदी आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या परिसरालगतच्या आसपासच्या गावांचा (Pune News) समावेश करून ही नवीन स्वतंत्र महापालिका करण्याचा विचार राज्य शासनाकडून केला जात आहे.

या नव्या महानगरपालिकेच्या निर्मितीसंदर्भातील प्राथमिक चाचपणी (Pune News) करण्यासाठी चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या भागांबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशिल गोळा केला जात आहे. जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे (Pune News) महापालिका आयुक्त आणि चाकण, आळंदी, राजगुरू नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे अहवाल मागून घेण्यात आला आहे. तिन्ही नगरपरिषदेतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबतचे हे अहवाल मागवून घेण्याबरोबरच अभिप्रायासह शासनाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडूनही अहवाल मागविला आहे.