धक्कादायक! पुण्यातील PSI ची आत्महत्या ; लोण्यावळ्यातील टायगर पॉईंट जवळ आढळली कार

0
1
pune crime news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्यातील पोलीस दलाला खळबळून सोडणारी एक बातमी आता समोर आली आहे. पुण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकांने लोणावळ्यात जाऊन आपली जीवन यात्रा संपवण्याची धक्कादायक घटना उघडाकीस आली आहे. अण्णा गुंजाळ असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशन इथं कार्यरत होते मात्र तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर रुजू झालेले नव्हते. तसेच त्यांचा कोणताही संपर्क झालेला नव्हता मात्र त्यांचा आज शोध लागला असता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

या घटनेमुळे महाराष्ट्रातील पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर त्यांची गाडी आढळली आहे आणि या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येच्या मागचं कारण दडलेलं असू शकत. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले असून खडकी पोलीस सुद्धा घटनास्थळी रवाना झाली आहेत.

पोलिसांकडून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पॉईंटवर असलेली गाडी ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मिळालेल्या डायरीमध्ये मृत्यू पूर्वी लिहिलेल्या काही घटना काही माहिती सापडते का याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.