Pune – Raigad Highway : महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. राज्यातील विविध भागातून पुण्यात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. इतर भागांबरोबरच कोकणातूनही पुण्यात ये – जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोकण आणि पुणे असा प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. पुणे आणि रायगड (Pune – Raigad Highway) हा जिल्हा एका नव्या महामार्गाने जोडला जाणार आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक नऊ जानेवारी 2024 पासून या नवा महामार्गाच्या (Pune – Raigad Highway) कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या भोरडे ते महाड येथील शेवते घाट दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शासनाने या महामार्गाच्या कामासाठी 30 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.
हा मार्ग एकूण 13 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 25 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबरोबरच हिवाळी अधिवेशनात या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी विशेष प्रयत्न केले होते.(Pune – Raigad Highway)
त्यामुळे थोपटे यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली असल्याने आमदार संग्राम यांच्या पुढाकाराला खऱ्या अर्थाने यश आल्याचे बोलले जात आहे. हा महामार्ग (Pune – Raigad Highway) पूर्ण झाल्यास पुणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यातील प्रवासी नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.