Pune Solapur Highway : पुणे-सोलापूर प्रवास होणार सुस्साट ; बांधण्यात येणार 3 नवे उड्डाणपूल

pune solapur highway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Solapur Highway : पुणे -सोलापूर प्रवास होणार सुस्साट ; बांधण्यात येणार 3 नवे उड्डाणपूल राज्यातील दुसरे महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्यामध्ये संपूर्ण देशामधून अनेक जण नोकरी आणि कामधंद्याच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे पुणे हे आयटी हब बरोबरच आता राज्यातील दुसरं सर्वात महत्त्वाचं शहर बनलं आहे. राज्यातलया इतर भागातून पुण्यामध्ये येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. अशातच पुणे – सोलापूर (Pune Solapur Highway) महामार्गाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास जलद होईल अशी आशा आहे कारण या राष्ट्रीय महामार्गावर तीन नवे उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर अर्जुनसोंड व अनगरपाटी या दोन ठिकाणी उड्डाणपूल व सर्विस रोड तयार केला जातो आहे. तर सावळेश्वर पाटीजवळ देखील एक उड्डाणपूल प्रस्तावित असून त्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर याचाही काम येत्या काही दिवसात (Pune Solapur Highway) सुरू होणार आहे. म्हणजेच या महामार्गावर नवे तीन उड्डाल पूल तयार होतील यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटेल आणि पुण्यापर्यंतचा प्रवास हा वेगवान होईल.

कधीपर्यंत होणार पूर्ण ? (Pune Solapur Highway)

सध्या हाती घेण्यात आलेल्या दोन उड्डाणपूलांसाठी म्हणजेच अर्जुन सोंड आणि अनगर पाटी जवळ बांधत असलेल्या उड्डाणपुलासाठी 64 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही उड्डाणपूलांचे काम एका वर्षात पूर्ण करण्याचा नियोजन आहे. या महामार्गावर अर्जुन सोंड जवळ उड्डाणपूल तयार होणार असून याचं काम सुरू आहे हा पूल चंदन नगर पुलापासून काही अंतरापर्यंत असणार आहे. अनगर पाटी जवळील उड्डाणपुलासाठी (Pune Solapur Highway) 45 कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी डिसेंबर 2025 ही मुदत ठरवण्यात आलेली आहे.

याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरचा तिसरा उड्डाणपूल हा सावळेश्वर जवळील उड्डाणपूल 30 कोटींचा खर्च करून तयार केला जाईल. याच्या मंजुरीचा प्रस्ताव प्राधिकरणाला पाठवला असून त्यापेक्षा मंजुरीची सूचना मिळाल्यानंतरच याचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे सोलापूरकर-पुणे प्रवास हा सोईस्कर आणि वेगवान होणार आहे.