Pune To Ayodhya Train : चलो अयोध्या …! ‘या’ तारखेपासून पुण्याहून अयोध्येला जाणार विशष ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune To Ayodhya Train : संपूर्ण देश सध्या येत्या २२ तारखेची वाट पाहत आहे. अयोध्येतील राम मंदिरात श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. तुम्हालाही अयोध्येला भेट द्यायची आहे का ? आता जनतेला राम दर्शन होण्यासाठी रेल्वेने (Pune To Ayodhya Train) एक हात पुढे केला आहे. अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्यांचे आयॊजन केले आहे. पुण्याहून देखील अयोध्येला विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत. जाला जाणून घेऊया याबाबत

रेल्वे प्रशासनाने 30 जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी 15 विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. दर दोन दिवसांनी एक ट्रेन अयोध्येसाठी पुण्याहून सुटणार आहे. भारतीय रेल्वेने प्रभू रामाच्या भक्तांसाठी 200 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. अयोध्येला जाण्यासाठी विशेष ट्रेनची मागणी भाविक करत होते. त्यानुसार 30 जानेवारीपासून पुणे ते अयोध्येपर्यंत 15 विशेष गाड्या चालवण्याचा (Pune To Ayodhya Train)निर्णय घेतला आहे. या सर्व गाड्या स्लीपर कोच असणार आहेत.

पुणे-अयोध्या-पुणे रेल्वे सेवेसाठी तीन रेक वापरले जाण्याची शक्यता आहे. अयोध्येहून पुण्याला (Pune To Ayodhya Train) जाण्यासाठी 15 विशेष गाड्या असतील. एका ट्रेनमधून सुमारे दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकणार आहेत. या गाड्यांचे बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. या गाड्यांना मिळालेला प्रतिसाद पाहून विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल. कोल्हापुरातूनही अयोध्येसाठी विशेष ट्रेन सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.पण, कोल्हापूर ते अयोध्येला गाडी सुरू झाल्यास पुण्यातील प्रवाशांना दुसरी ट्रेन मिळेल.

आरक्षण, सुपर फास्ट चार्जेस, केटरिंग चार्जेस, सर्व्हिस चार्ज आणि जीएसटी सारखे शुल्क लागू होतील. या गाड्यांमध्ये IRCTC कडून फक्त शाकाहारी जेवण दिले जाईल. दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर येथून अयोध्येसाठी आस्था (Pune To Ayodhya Train) विशेष गाड्या.

दिल्ली

नवी दिल्ली स्टेशन – अयोध्या – नवी दिल्ली स्टेशन

आनंद विहार – अयोध्या – आनंद वियार

निजामुद्दीन – अयोध्या – निजामुद्दीन

जुने दिल्ली रेल्वे स्थानक – अयोध्या धाम – जुनी दिल्ली रेल्वे स्थानक

गुजरात

उधना – अयोध्या – उधना

इंदूर – अयोध्या – इंदूर

महेसाणा – सालारपूर – महेसाणा

वापी – अयोध्या – वापी

वडोदरा – अयोध्या – वडोदरा

पालनपूर – सालारपूर – पालनपूर

वलसाड – अयोध्या – वलसाड

साबरमती – सालारपूर – साबरमती

मध्य प्रदेश (Pune To Ayodhya Train)

इंदूर – अयोध्या – इंदूर

बीना – अयोध्या – बीना

भोपाळ – अयोध्या – भोपाळ

जबलपूर – अयोध्या – जबलपूर

महाराष्ट्र

मुंबई – अयोध्या – मुंबई

नागपूर – अयोध्या – नागपूर

पुणे – अयोध्या – पुणे

वर्धा – अयोध्या – वर्धा

जालना – अयोध्या – जालना

गोवा – 1 आस्था स्पेशल

तेलंगणा

सिकंदराबाद – अयोध्या – सिकंदराबाद

काजीपेट जंक्शन – अयोध्या – काजीपेट जंक्शन

तामिळनाडू

चेन्नई – अयोध्या – चेन्नई

कोईम्बतूर – अयोध्या – कोईम्बतूर

मदुराई – अयोध्या – मदुराई

सालेम – अयोध्या – सालेम

जम्मू-काश्मीर (Pune To Ayodhya Train)

जम्मू-अयोध्या-जम्मू

कटरा – अयोध्या – कटरा