वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनांची संख्या यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तेव्हा राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरातल्या मोठ्या शहरांमध्ये ही समस्या आहे. कामानिमित्त कुठेतरी बाहेर जायचं असेल तर साधारण एक तास आधी निघण्याची सवय आता आपल्याला लावून घेतली पाहिजे. कारण आहे वाहतूक कोंडी. पण एका रिपोर्टनुसार देशातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी ही कोलकता शहरांमध्ये होत असल्याचं दिसून आलेले आहे. दुसऱ्या क्रमांकावर आयटीसीटी बंगळूर आणि चौथ्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्रातल्या पुण्याचा नंबर लागतो. याबाबतचा रिपोर्ट टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स यांच्याकडून सादर करण्यात आला आहे.
आधीच इतर सर्व गोष्ट मध्ये अव्वल असणाऱ्या पुण्यानं आता ट्रॅफिकच्या बाबतीतही झेंडा रोवलाय. टॉम टॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टनुसार भारतातली तीन शहर सर्वाधिक वाहतूक कोंडी मध्ये आघाडीवर आहेत. यातलं सर्वात पहिलं शहर म्हणजे पश्चिम बंगालची राजधानी कोलकता आहे. कोलकता मध्ये वाहनातून दहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी किमान 34 मिनिटे 33 सेकंद लागतात. तर बंगळुरू मध्ये वाहनातून दहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी 34 मिनिटे दहा सेकंद लागतात. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या पुणे शहरात दहा किलोमीटर गाठण्यासाठी किमान 33 मिनिटे 22 सेकंद लागतात.
तर दुसरीकडे हैदराबाद मध्ये वाहनातून दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किमान 32 मिनिटे लागतात. तर चेन्नईमध्ये दहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी 30 मिनिटे लागतात. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी 29 मिनिटे लागत असल्याची माहिती या रिपोर्ट मधून समोर आली आहे
आता ह्या ट्रॅफिकच्या समस्येची कारण काय आहेत ? तर जुने रस्ते, रस्त्यांचा घसरलेला दर्जा, वाहनांची वाढणारी संख्या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्यांचा दर्जा सुधारणे, शहराचे योग्य प्रकारे नियोजन करणे, सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर करण्यासाठी चालना देणं असे वेगवेगळे उपाय करून मंदावलेल्या वाहतुकीचा वेग वाढवणं शक्य असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.