Pushkar Jog : पुष्कर जोगच्या ‘धर्मा- दि AI स्टोरी’ सिनेमाची घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाला…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pushkar Jog) मराठी सिनेविश्वातील निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळी कायम वेगवेगळ्या विषयाचे, धाटणीचे कथानक असलेल्या कलाकृती सादर करताना दिसतात. गेल्या काही काळात सिने विश्वाने केलेली प्रगती उल्लखनीय आहे. दरम्यान, पुन्हा एकदा अत्यंत वेगळ्या विषयावर भाष्य करणारा एक नवा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ स्टोरी असून हा चित्रपट आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे, असे समजत आहे.

धर्मा- दि एआय स्टोरी

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. ज्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे दिग्दर्शन अभिनेता पुष्कर सुरेखा जोग (Pushkar Jog) करत आहे. पुष्कर जोगने कायमच मराठी सिनेसृष्टीला हटके विषय दिले आहेत. त्यामुळे पुष्करचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण ठरला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातूनही तो प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट दाखवेल अशी आशा आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या तेजल पिंपळे आहेत.

मध्यवर्ती भूमिकेत झळकणार ‘हे’ कलाकार

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या आगळ्या वेगळ्या मराठी चित्रपटामध्ये अत्यंत कमाल कलाकार मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहेत. ज्यामध्ये स्वतः पुष्कर सुरेखा जोग (Pushkar Jog) काम करताना दिसणार आहे. त्यासोबत अभिनेत्री दीप्ती लेले आणि मराठी सिनेविश्वाची पारू अर्थात अभिनेत्री स्मिता गोंदकर प्रमुख भूमिकेत आहेत. आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी फक्त सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून पाहिली आहे. मात्र, हा विषय आता थेट मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ विषयीची उत्सुकता वाढताना दिसतेय.

धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या बापाची कहाणी (Pushkar Jog)

अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोगने सोशल मीडियावर मुहूर्ताचे फोटो शेअर करत लिहिलंय, ‘Lights … कॅमेरा… आणि AI च्या जंजाळात आपल्या मुलीच्या शोधात एका बापाचा प्रवास… धर्मा – The AI Story.. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला’. यासोबत आपल्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना पुष्करने सांगितले की, ‘मराठी मनोरंजन विश्वात हा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. या चित्रपटाचा विषय नवीन असून यामध्ये तुम्हाला अनेक नवीन गोष्टी दिसतील’.



‘हा विषय एआयवर आधारित आहे. कसा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या बापाची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. (Pushkar Jog)चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात सुरू झाली असून सप्टेंबर महिन्यात ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येईल’.