Raigad Fort Ropeway : किल्ले रायगडाच्या रोप वे सुविधेबाबत मोठा निर्णय; यशस्वी चाचणीनंतर लवकरच चौथी ट्रॉली सुरु होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raigad Fort Ropeway) आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे इथे अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे पहायला मिळतात. ज्यामध्ये अनेक गडकिल्ल्यांचा समावेश आहे. हे गड किल्ले आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि पराक्रमाची साक्ष देत आहेत. महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत. ज्यामध्ये ‘रायगड’ हा किल्ला विशेष मानला जातो. कारण ‘रायगड किल्ला’ हा स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. हा अत्यंत भव्य डोंगरी किल्ला सर करण्यासाठी कायम पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांसाठी एक खास बातमी आहे.

स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. त्यामुळे रायगड किल्ल्यावर (Raigad Fort Ropeway) कायम मोठ्या संख्येने शिवभक्त, पर्यटक आणि गिर्यारोहक येत असतात. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाडपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. मुख्य म्हणजे हा डोंगरी किल्ला असल्यामुळे तो सर करणे वाटते तितके सोप्पे नाही. असे असूनही अनेक मंडळी या किल्ल्यावर आवर्जून येताना दिसतात.

रोप वे सुविधेसंदर्भात महत्वाचा निर्णय (Raigad Fort Ropeway)

रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य रस्ता ते महाद्वारापर्यंत पायरी रस्ता आहे. शिवाय रोप वेची देखील सुविधा उपलब्ध आहे. दरम्यान, अनेक लोक रोप वे सुविधेचा वापर करून रायगडावर जाताना दिसतात. (Raigad Fort Ropeway) मात्र, अनेकदा रोप वेसाठी होणारी गर्दी फार मोठी असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन किल्ले रायगड रोप वे सुविधेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत रायगडावर जाण्यासाठी ३ रोप वे ट्रॉली काम करत होत्या. मात्र, गर्दीचे व्यवस्थापन कारण्याहेतू आता लवकरच चौथी ट्रॉली सुरु करण्यात येणार आहे.

कधी सुरु होणार?

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये विसावलेला रायगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर म्हणजेच २७०० फूट उंचीवर आहे. यामुळे रोप वे सुविधेचा बऱ्यापैकी वापर केला जातो. दरम्यान, या सुविधेसाठी होणाऱ्या गर्दीचे नीट व्यवस्थापन करता यावे म्हणून येत्या २३ एप्रिल २०२४ पासून चौथी रोप वे ट्रॉली (Raigad Fort Ropeway) सुरु करण्यात येणार आहे. यासाठी आधी एक चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये यशप्राप्तीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता एकाचवेळी ४ रोप वे ट्रॉलीच्या माध्यमातून २४ पर्यटक हा किल्ला अवघ्या ५ मिनिटांत सर करू शकणार आहेत. किल्ले रायगडावरील रोप वेमध्ये आणखी एक ट्रॉली जोडण्याचा निर्णय हा पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी खरोखरच दिलासादायक ठरणार आहे.