Railway Fine : रेल्वे स्टेशनवर ब्रश कराल तर भरावा लागेल दंड; पहा काय सांगतो रेल्वेचा नियम ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Railway Fine : रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांमध्ये प्रवासी राहतात. मात्र अनेकदा लॉन्ग जर्नी असेल तर प्लॅटफॉर्म वर असलेल्या नळावर ब्रश करणे जेवण करून डबे धुणे (Railway Fine) असे प्रकार सर्रास होत असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की रेल्वे स्टेशन परिसरात नळ किंवा इतर ठिकाणी (शौचालय सोडून) दात घासणे आणि भांडी धुणे हा गुन्हा आहे. एव्हढेच नाही तर रेल्वे प्रशासन (Railway Fine) त्यासाठी तुम्हाला दंडही आकारू शकते.

रेल्वे अधिनियम 1989 नुसार, ब्रश करणे, थुंकणे, शौचालय, भांडी धुणे, कपडे किंवा रेल्वेच्या आवारातील नियुक्त ठिकाणांव्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट गुन्ह्याच्या श्रेणीत येते. या सगळ्या गोष्टी केवळ शौचालये इत्यादी नियुक्त ठिकाणीच करता येतात. जर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तुम्हाला हे प्रतिबंधित कृत्य करताना पकडले तर प्रवाशाकडून 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. रेल्वेच्या नियमानुसार (Railway Fine) अशा कृत्यांसाठी दंड आकारण्याची तरतूद आहे.

तुम्ही रेल्वे किंवा रेल्वेच्या आवारात कोणत्याही ठिकाणी काही लिहिल्यास किंवा चिकटवल्यास, रेल्वे कायद्यानुसार यावर दंड (Railway Fine) आकारला जाऊ शकतो. चिप्स किंवा इतर गोष्टी खाल्ल्यानंतर बहुतांश प्रवासी स्टेशनच्या आवारातील रिकाम्या जागेत रॅपर टाकतात. हा देखील गुन्हा आहे. ठराविक ठिकाणाव्यतिरिक्त कोणत्याही भरलेल्या किंवा रिकाम्या रेल्वेच्या (Railway Fine) आवारात किंवा डब्यात कचरा टाकता येणार नाही.

या संदर्भात उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेने (Railway Fine) दात घासण्यासाठी, भांडी, कपडे किंवा इतर गोष्टी धुण्यासाठी जागा निश्चित केली आहे. प्लॅटफॉर्मवरील नळांवर, नियुक्त केलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी प्रवासी ब्रश करणे किंवा इतर काम करताना आढळल्यास, त्याच्यावर दंडाची तरतूद आहे. रेल्वेचा व्यावसायिक विभाग वेळोवेळी कारवाई करून अशा लोकांवर दंड वसूल करतो.