Railway News : मुंबईनंतर पुणे हे महत्त्वाचे शहर बनले आहे. अवघ्या महाराष्ट्रातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी आणि नोकरी धंद्यासाठी येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. राज्यातील इतर भागाप्रमाणेच भुसावळ मधून सुद्धा अनेक नागरिक हे पुण्यामध्ये ये जा करीत असतात. मात्र भुसावळ कडून पुण्याला जाण्यासाठी स्वतंत्र अशी रेल्वे नाही. मात्र आता लवकरच मध्य रेल्वे कडून भुसावळ ते पुणे अशी स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे यासाठीचा (Railway News) प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
हुतात्मा एक्सप्रेस आता अमरावती येथून सुटते त्यामुळे भुसावळ जळगावच्या प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी भुसावळ ते पुणे अशी स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्याची (Railway News) मागणी होत आहे.
भुसावलसह ‘या’ गावांना फायदा (Railway News)
भुसावळ येथील डीआरएम कार्यालयात रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली यावेळी बोलताना डीआरएम इती पांडे यांनी प्रस्तावित भुसावळ ते पुणे या नवीन रेल्वे गाडीची माहिती दिली. ही नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यालयात (Railway News) पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच पुण्यासाठी भुसावळ हून रेल्वेगाडी सुरू होऊ शकेल त्यामुळे भुसावळ सह जळगाव पाचोरा आणि चाळीसगावच्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल असंच पांडे यांनी स्पष्ट केलं.
या बैठकीला वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार तसेच समितीचे सदस्य अनिरुद्ध कुलकर्णी, किरण बोरसे, महेंद्र कुमार, बुरड, दिलीप पाटील किरण राणे आदी उपस्थित होते संबंधित सर्व सदस्यांनी प्रवासी सुविधा वाढवण्याची देखील (Railway News) मागणी केली. याशिवाय प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी नवीन गाड्या चालवणे, जुन्या गाड्यांचा विस्तार करणेथांबे वाढवणे या मुद्यांकडे देखील रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधलं.