Railway WhatsApp Number : WhatsApp च्या मदतीने घेता येणार रेल्वे सुविधांचा लाभ ; एका क्लिकवर मिळणार संपूर्ण माहिती

whats app
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Railway WhatsApp Number : सोशल मीडियाचा वापर सध्या केवळ मनोरंजनासाठी नाही तर इतरही महत्वाच्या गोष्टींकरिता केला जात आहे. सोशल मीडिया अँप्स पैकी प्रसिद्ध असलेले व्हाट्स अँप आता केवळ चॅटिंग पुरते मर्यादित नाही तर याचा वापर मार्केटिंग , मनी ट्रान्सफर अशा अनेक गोष्टींकरिता प्रभावीपणे करता येतो. त्यात आणखी भर म्हणून रेल्वे सेवांचा लाभ सुद्धा तुम्हाला आता व्हॉट्सॲप (Railway WhatsApp Number) वर घेता येणार आहे.

कोणत्या सोयींचा समावेश ?

आता व्हॉट्सॲपच्या मदतीने रेल्वेशी संबंधित अनेक सेवांचा लाभ घेता येणार आहे. ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी व्हॉट्सॲपवर पीएनआर स्टेटस, थेट ट्रेनची स्थिती, फूड ऑर्डर, ट्रेनचे तिकीट बुकिंग, ट्रेनचे वेळापत्रक, कोचची स्थिती, ट्रेनमध्ये प्रवास करताना कोणतीही गैरसोय झाल्यास तक्रार कशी करावी इत्यादी विविध माहिती मिळवू शकतात. .

कसा घ्याल लाभ ? (Railway WhatsApp Number)

WhatsApp Relofy चॅटबॉटच्या आधारे काम करते. रेल्वेच्या व्हॉट्सॲप सेवेसाठी ९८८११-९३३२२ सेव्ह करावा लागेल.

नंबर सेव्ह केल्यानंतर मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप (Railway WhatsApp Number) ओपन करा. व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला या चॅटबॉटच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन इंग्रजीमध्ये हाय लिहावे लागेल.

काही वेळाने एक मेसेज येईल, ज्यामध्ये PNR स्टेटस, फूड ऑर्डर, ट्रेन स्टेटस असे अनेक पर्याय दिसतील.

या पर्यायांमध्ये ट्रेनमधील खाद्यपदार्थ, माझी ट्रेन कुठे आहे, प्रवासाची हमी निश्चित करा, बुक रिटर्न तिकीट, ट्रेनचे वेळापत्रक, कोचची स्थिती आणि ट्रेन प्रवासादरम्यानच्या तक्रारींचा समावेश आहे.

सिलेक्ट सर्व्हिस वर जाऊन, पर्याय निवडून, पुढील प्रक्रियेचे अनुसरण करून आणि लिंकवर क्लिक करून, आपण पुढे जाऊ शकता .