महाराष्ट्रात हवामान बदलणार ! ‘या’ भागांत अवकाळी पावसाची शक्यता

maharashtra weather
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. उष्णतेची लाट ओसरल्यानंतर आता काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

कोणत्या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज?

उत्तर महाराष्ट्र: धुळे, नंदूरबार, जळगाव
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली
विदर्भ: चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या भागांत विजांसह ढगांचा गडगडाट ,30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे तर काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील काही दिवस राज्यातील मुंबई कोकण विभागात कोरडं वातावरण कायम राहील , किमान तापमान: 24-26°C| कमाल तापमान: 34-36°C राहण्याची उन्हाचा त्रास अधिक जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागांतील 10 जिल्ह्यांत (खानदेश ते कोल्हापूर-सोलापूरपर्यंत) 18 ते 20 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलका पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सरींची शक्यता असून 21-22 मार्च रोजी विदर्भातील वातावरण अधिक अस्थिर अंदाज आहे. कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेचा प्रभाव राहणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक ती तयारी करावी. कापणी केलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्या.