Ram Mandir : आयोध्यावारी करा थेट विमानाने ; स्पाईस जेटने सुरु केली बजेटमध्ये सवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ram Mandir : अयोध्येत रामलला विराजमान झाले आहेत. तुम्हाला सुद्धा अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घ्यायचे असेल तर एक भारी पर्याय तुमच्यासमोर आहे. तुम्ही आता विमानाने अयोध्येला (Ram Mandir) जाऊ शकता. कारण आयोध्येसाठी स्पाईसजेट या कंपनीने खास बजेटमध्ये यात्रा सुरु केली आहे. देशातल्या विविध शहरांमधून ही सेवा स्पाइसजेटने सुरु केली आहे.

आता केवळ 1622 रुपयांमध्ये नॉनस्टॉप फ्लाईट बुक करण्याची संधी आहे. याशिवाय स्पाइस जेट वेबसाईट (Ram Mandir) नुसार तुम्ही फ्री डेट चेंज ऑफर्स प्रवासाची तारीख सहजपणे बदलू शकता परंतु काही अटींची पूर्तता तुम्हाला करावे लागणार आहेत. एक फेब्रुवारी 2024 पासून आयोध्येला इतर अनेक शहरांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच एक तारखेपासून स्पाइसची आयोध्या यात्रा चेन्नई, आमदाबाद, दिल्ली, मुंबई, बेंगलोर, जयपुर, पटना आणि दरभंगा इथून सुरू होणार आहे.

कालावधी निश्चित (Ram Mandir)

लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की ही ऑफर ठराविक कालावधीसाठी मर्यादित आहे. बुकिंग पिरेड बावीस ते 28 जानेवारी 2024, ट्रॅव्हल 22 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंतचा आहे. म्हणजे तुम्हाला स्पाइस जेटच्या या सुविधेचा वापर करून आयोध्या वारी करायची असेल तर 22 ते 28 जानेवारीच्या दरम्यान बुकिंग करावं लागेल आणि तुमचा प्रवास तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत करू शकता.

काय आहेत नियम आणि अटी (Ram Mandir)

  • विक्री ऑफर 22 जानेवारी 2024 ते 28 जानेवारी 2024 पर्यंत उपलब्ध असेल
  • विक्री ऑफर फक्त 22 जानेवारी 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या प्रवास कालावधीसाठी वैध आहे.
  • विक्री ऑफर केवळ निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, थेट एका बाजूच्या फ्लाईटवर उपलब्ध आहे.
  • या ऑफर अंतर्गत प्रथम येणाऱ्यांस प्रथम प्राधान्य (Ram Mandir) दिले जाईल