Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी ? शाळा महाविद्यालये सुरु राहणार की बंद ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा येत्या २२ तारखेला मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. अवघा देश हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी तयारी करीत आहे. या दिवशी देशभरातील विविध भागात जणू दिवाळी साजरी होणार आहे. एव्हढेच नाही देशातील काही Ram Mandir राज्यांनी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मध्यप्रदेश साहित अनेक राज्यांनी या दिवशी शाळा कॉलेज ना सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत काय आहे परिस्थिती जाणून घेऊया.

मध्यप्रदेश

मध्यप्रदेशात मोहन यादव यांनी 22 जानेवारीला (Ram Mandir) शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच तिथे लोकांना हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा व्हावा असे सांगितले आहे. मोहन यादव यांनी 22 जानेवारीला राज्यात दारू आणि भांग विक्रीच्या दुकानासह सर्व प्रकारची दुकान बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत.

हरियाणा

हरियाणा सरकारला राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर 22 शनिवारी ला शाळा बंद (Ram Mandir) ठेवायची घोषणा केली आहे. तसेच या दिवशी राज्यात कुठेही मद्यपान करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

छत्तीसगड

छत्तीसगड सरकारने 22 जानेवारीला राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे तर मुख्यमंत्री विष्णू देवस्थान (Ram Mandir) यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली आहे.

गोवा

गोवा सरकारने 22 जानेवारीला सर्व सरकारी कर्मचारी आणि शाळांना सुट्टी जाहीर केली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळाचे बैठकीनंतर सांगितले की शाळा सरकारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी (Ram Mandir) असणार आहे.

महाराष्ट्र (Ram Mandir)

दरम्यान महाराष्ट्राचा विचार करता राज्यातील आमदार सत्यजित तांबे यांनी 22 जानेवारीला आयोध्यातील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सह उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांना पत्र लिहिले आहे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्याची विनंती करण्यात आली आहे.

22 जानेवारीला अनेक लोक रस्त्यावर उतरतील त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही. असं त्यांनी म्हटल आहे. महाराष्ट्र सरकारने अद्याप या संबंधी निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना एखाद्या सणा प्रमाणे हा दिवस साजरा करण्याचे अवाहन केले आहे.