Ram Mandir : रामललाची मोठ्या थाटामाटात प्राण प्रतिष्ठापना झाली आहे. आता मंदिर सर्व भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. देशभरातून मोठ्या संख्येने इथे भाविक येत आहेत. अयोध्येला जाण्यासाठी विषेश बस, रेल्वे आणि विमानांची सुद्धा सुविधा करण्यात आली आहे. तुम्हाला देखील रामाचे दर्शन (Ram Mandir) अयोध्येला जाऊन घ्याचे असल्यास तेथील आरतीची वेळ आणि बुकिंग या सगळ्या विषयी आम्ही आजच्या लेखात माहिती देत आहोत.
आरतीच्या वेळा : (Ram Mandir)
- जागरण/श्रृंगार आरती – सकाळी ६:३०
- भोग आरती – दुपारी १२
- संध्या आरती – संध्याकाळी 7.30 वा
दर्शनाच्या वेळा:
राम मंदिरात सकाळी 7 ते 11:30 आणि दुपारी 2 ते 7 या वेळेत भाविकांना मंदिराचे दर्शन (Ram Mandir) घेता येईल.
आरती/दर्शनासाठी बुकिंग कसे करावे?
- भाविकांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- तुमचा मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा. तुम्हाला नोंदणीसाठी एक ओटीपी मिळेल.
- ‘माय प्रोफाइल’ वर जा आणि आरती किंवा दर्शनासाठी (Ram Mandir) इच्छित स्लॉट बुक करा.
- तुमची ओळखपत्रे द्या आणि तुमचा पास बुक करा.
मंदिर प्रवेश प्रक्रिया:
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने यापूर्वी सांगितले होते की भाविकांना त्यांच्या प्रवेश पासवर नमूद (Ram Mandir) केलेले QR कोड स्कॅन केल्यानंतर मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल.
आवारात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला मंदिराच्या काउंटरवरून तुमचा पास गोळा करावा लागेल.