Ram Mandir : अयोध्येत मंदिराच्या गाभाऱ्यात सीतेशिवाय रामाची मूर्ती..! असे का? ट्रस्टने दिले उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर चा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. याची जय्यत तयारी संपूर्ण देशभर सुरू आहे देशभराच्या विविध भागातून. हा दिवस उत्सवासारखा साजरा करण्याची तयारी सुरू आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? अयोध्येतील राम मंदिरामध्ये गाभाऱ्यात ठेवण्यासाठी तीन मुर्त्या तयार केल्या गेल्या आहेत या मुर्त्या कर्नाटकातील मूर्तिकार आणून अरुण योगीराज यांनी बनवल्या आहेत मात्र ही मूर्ती फक्त भगवान श्रीरामांची  (Ram Mandir)आहे त्यासोबत सीता माता किंवा लक्ष्मण नाही. आता असे का बरे आहे कारण बहुतांशी मंदिरामध्ये आपण राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मुर्त्या पाहत असतो . तर याचे उत्तर श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे.

गाभाऱ्यात का नाही माता सीतेची मूर्ती?

70 एकरांवर उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरात गर्भगृहात रामललाची (Ram Mandir) मूर्ती बसवण्यात येणार आहे. हे रामाचे रूप असेल ज्यामध्ये तो 5 वर्षाच्या मुलाच्या रूपात असेल. ही मूर्ती बालस्वरूपाची असल्याने मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात माता सीतेची मूर्ती असणार नाही. याबाबत माहिती देताना चंपत राय यांनी सांगितले की, “मुख्य मंदिर 360 फूट लांब आणि 235 फूट रुंद असेल. मंदिराचे शिखर १६१ फूट उंच असेल. राम लल्ला ज्या भागात राहणार आहेत त्या गर्भगृहात जाण्यासाठी ३२ पायऱ्या चढून जावे लागेल.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मूर्ती स्थापन केली जाईल ती त्या स्वरूपाची असेल ज्यामध्ये देवाचे लग्न झालेले नाही. म्हणजे तुम्हाला मुख्य मंदिरात सीतेची मूर्ती दिसणार नाही”.

जन्मभूमी परिसरात आणखी 7 मंदिरे

मुख्य मंदिराव्यतिरिक्त जन्मभूमी संकुलात आणखी 7 मंदिरे बांधली जात आहेत. यामध्ये प्रभू रामाचे (Ram Mandir) गुरू ब्रह्मर्षी वशिष्ठ, ब्रह्मर्षी विश्वामित्र, महर्षी वाल्मिकी, अगस्त्य मुनी, रामभक्त केवत, निषादराज आणि माता शबरी यांच्या मंदिरांचा समावेश आहे.

32 पायऱ्या चढून राम दर्शन होईल

राम मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापूर्वी तुम्हाला खूप लांबचा प्रवास करावा लागेल. मंदिरात प्रवेश पूर्वेकडील सिंह दरवाजातून होईल. सिंग गेटपासून ३२ पायऱ्या चढून गेल्यावर तुम्ही प्रथम रंगमंडपात पोहोचाल. येथे भगवान रामाच्या (Ram Mandir) जीवनाशी संबंधित चित्रे आणि पात्रे भिंतींवर कोरलेली आहेत. रंगमंडपातून पुढे गेल्यावर नृत्य मंडप समोर येईल. हे गर्भगृहाच्या सर्वात जवळचे ठिकाण आहे. नृत्यमंडपात देवी-देवतांच्या मूर्ती आणि रामायणातील श्लोक दगडांवर सुंदर कोरलेले आहेत. नृत्य मंडपातून पुढे गेल्यावर तुम्हाला परमेश्वराचे गर्भगृह दिसेल. येथे 22 तारखेला पंतप्रधान मोदी राम लल्लाचा (Ram Mandir) अभिषेक करणार आहेत.