Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यापासून देश विदेशातून रामलल्लाचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या वधू लागली आहे. भारत सरकारच्या वतीने राम मंदिर भेटीसाठी देशभरातुन विशेष ट्रेन देखील सुरु केल्या आहेत. मात्र आता खास ट्रेन नंतर राम दर्शनासाठी एस टी महामंडळाने पुढाकार घेतला असून तुम्ही जर गुपने अयोध्येला (Ram Mandir) जाऊ इच्छित असाल तर एस टी महामंडळ तुमची सोय करणार आहे. यासाठी काय नियम असतील ? किती भाडे आकारले जाईल ? चला जाणून घेऊया सर्व माहिती
45 ते 55 जणांच्या ग्रुपसाठी सोय
राम मंदिराच्या दर्शनासाठी आता एसटी महामंडळाने पुढाकार घेतला असून आयोध्याला (Ram Mandir) जाण्यासाठी जवळपास 45 ते 55 जणांच्या भाविकांचा ग्रुप असेल तर एक बस सोडण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांना राम लल्लाचे दर्शन घेता येणार आहे.राज्यातून धुळे जिल्ह्यातून पहिली बस दर्शनासाठी सोडण्यात आली होती. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातून मागणीनुसार बसेस सोडल्या जातील जर भाविकांचा 50 जणांचा ग्रुप असेल तर त्यांच्या मागणीनुसार आणि सोयीनुसार पाहिजे ती गाडी देण्यात येणार आहे.
कितीभडे आकारले जाईल ? (Ram Mandir)
अयोध्येला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी प्रति किलोमीटर 56 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी 50 भाविकांनी (Ram Mandir) एकत्र येऊन ग्रुप तयार करावा लागेल या प्रवासासाठी चांगल्या गाड्या देण्यात येतील. तसेच सोबत दोन चालक असतील. या यात्रेदरम्यान तीन-चार मुक्काम होतील आरामदायी प्रवासासाठी शिवशाही तर ज्यांना स्वस्तात प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी मागणीप्रमाणे साधी लालपरी बस ही देण्यात येईल.
परमिट काढण्याची गरज नाही
एसटी महामंडळाचा राज्यात व परराज्याशी प्रवासी वाहतुकीचा करार असलेल्या राज्यात एसटीची प्रवासी वाहतूक करताना परमिट (Ram Mandir) काढण्याची गरज नाही त्यामुळे आयोध्याला जाताना मध्य प्रदेश उत्तर प्रदेशात दोन्ही राज्यातील वाहतूक परमिट काढावा लागतो. भाड्याच्या स्वरूपात ते प्रवाशांकडून घेतलं जाईल.