Ramayana :आपल्याला माहितीच आहे की रामायणाची क्रेझ केवळ भारतातच नाही तर परदेशात सुद्धा आहे. एवढेच नाही तर जगात भारताशिवाय असाही एक देश आहे जिथे रामाची पूजा केली जाते. रामायण तिथला राष्ट्रीय ग्रंथ आहे. गोष्ट एवढ्यावरच संपत नाही तर या देशातील राजा सुद्धा स्वतःला भगवान श्रीरामांचा वंशज मानतो. आता तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडला असाल हा देश कोणता ? चला तर मग जाणून घेऊया या देशाबद्दल आणि रामाच्या (Ramayana) तथ्याबद्दल काही रोजच गोष्टी …
तर आम्ही ज्या देशाबद्दल बोलत आहोत तो देश म्हणजे थायलंड. थायलंड हे पर्यटनाच्या दृष्टीने खूप चांगले ठिकाण आहे. थायलंडमध्ये हजारो बेटे आहेत. अनेक सांस्कृतिक ठिकाणे आहेत. आणि येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हाँगकाँग जगातील पाहण्यासारख्या ठिकाणांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होते. तर, थायलंडची राजधानी बँकॉक दुसऱ्या (Ramayan) क्रमांकावर होती.
थायलंड मधील रामायण ‘राम कियेन’ (Ramayan)
मात्र हे तुम्हला माहिती आहे का ? भारताचा पवित्र हिंदू ग्रंथ हा थायलंडचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. थायलंडमध्ये रामायणाला ‘राम कियेन’ म्हणतात. वाल्मिकीजींच्या रामायणावर आधारित आहे. त्याला द ग्लोरी ऑफ राम असेही म्हणतात. त्यात थायलंडच्या काही पौराणिक कथाही आहेत. राम थायलंडमध्ये अत्यंत पूजनीय आहेत. थायलंडचा सध्याचा राजा देखील स्वत:ला रामाचे वंशज असल्याचं मानतो.एवढेच नाही तर राजा आपल्या नावाच्या आधी राम देखील लावतो. त्यामुळेच आजही थायलंडमध्ये रामायणाबद्दल खूप उत्साह आणि आदर आहे.
थायलंडमध्ये हिंदूंचा प्रभाव (Ramayan)
थायलंड जरी रामायणाला राष्ट्रीय ग्रंथ मानतो. अनेक लोक त्याला फॉलो करतात. पण जर आपण लोकसंख्येबद्दल बोललो तर थायलंडमध्ये हिंदूंची लोकसंख्या खूपच कमी आहे. आणि हे फक्त आजचं नाही. थायलंडमधील हिंदू नेहमीच योग्य अल्पसंख्याक होते. 2020 च्या जनगणनेनुसार, थायलंडमध्ये सुमारे 84,000 हिंदू राहतात. जे लोकसंख्येच्या 0.1% आहे. पण असे असूनही थायलंडमध्ये हिंदूंचा (Ramayan) चांगला प्रभाव आहे.