Rauf Azhar killed : पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मिळणारा आश्रय आणि संरक्षण आता त्यांच्या मृत्यूचं कारण ठरत आहे. भारताने नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एक मोठं यश मिळवलं आहे. जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा महत्त्वाचा नेता आणि IC-814 हायजॅक प्रकरणाचा मास्टरमाइंड रौफ अजहर याला पाकिस्तानात ठार मारण्यात आलं आहे. रौफ अजहरचा मृत्यू झाल्याची बातमी पाकिस्तानी माध्यमांमध्ये दाखवली जात आहे. ही कारवाई भारताच्या परकीय धोरणातील बदललेल्या दृष्टिकोनाची स्पष्ट झलक आहे ‘आमच्यावर हल्ला केलात, तर आम्ही घरात घुसून मारू!’
कोण होता रौफ अजहर? (Rauf Azhar killed)
रौफ अजहर हा जैश-ए-मोहम्मदचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता आणि मसूद अजहरचा लहान भाऊ. 1999 साली इंडियन एअरलाईन्सच्या IC-814 विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. कंदहारमध्ये हे विमान उतरवण्यात आलं आणि प्रवाशांच्या बदल्यात भारत सरकारला मसूद अजहरसह दोन इतर दहशतवाद्यांना सोडावं लागलं. या संपूर्ण कटाचा मेंदू रौफ अजहर होता. याच रौफने पुढे 2001 साली संसद भवनावर हल्ला घडवून आणला. 2019 च्या पुलवामा हल्ल्यात त्याचा अप्रत्यक्ष सहभाग होता. शिवाय, 2002 साली अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांची अपहरण करून हत्या केल्यामागेही याचं नाव होतं.
बहावलपूरमध्ये एअर स्ट्राइक
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेनं बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर (Rauf Azhar killed) लक्ष्य साधून हवाई हल्ला केला. यामध्ये रौफ अजहरसह मसूद अजहरच्या कुटुंबातील 10 जण ठार झाल्याचं कळतंय. या घटनेनंतर मसूद अजहरने “मीही मेलो असतो, तर बरं झालं असतं” अशी प्रतिक्रिया दिल्याचं पाकिस्तानी माध्यमांमधून समोर आलं आहे.
ISI आणि पाकिस्तानी संरक्षण यंत्रणांचा पाठींबा
रौफ अजहर पाकिस्तानात खुलेआम फिरत होता. त्याला ISI आणि पाकिस्तानी सैन्याचे संरक्षण मिळालं होतं. रावळपिंडीसारख्या शहरांमध्ये त्याची उपस्थिती अनेकदा दिसली होती. अनेक देशांनी त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती. 2010 मध्ये अमेरिकेने त्याच्यावर प्रतिबंध लावले. भारतानेही संयुक्त राष्ट्रात त्याला ग्लोबल टेररिस्ट (Rauf Azhar killed) घोषित करण्यासाठी प्रयत्न केले, पण चीनने वारंवार व्हीटोचा वापर करून या प्रयत्नांना अडथळा आणला.
ऑपरेशन सिंदूर
ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक कारवाईचं नाव नाही, तर भारताने स्वीकारलेलं नवे युद्धनीती धोरण आहे. आता भारत कुठलाही दहशतवादी हल्ला सहन करणार नाही, हे पुन्हा सिद्ध झालं आहे. कारवाई भारताच्या हद्दीतून असेल किंवा शत्रूच्या भूमीत दहशतवाद्याचा खात्मा हा अंतिम उद्देश आहे.भारत सरकारने यावर अधिकृत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेलं नाही. देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना ठार करण्यात येईल.”
पुढचं लक्ष्य कोण ? (Rauf Azhar killed)
- मसूद अजहर
- हाफिज सईद
- झकीउर रहमान लखवी
- अन्सार गजवत-उल-हिंदसारख्या फुटीर गटांचे नेते
भारतीय गुप्तचर संस्थांच्या यादीत आणखी काही नावं असल्याचं सूत्रांकडून समजतं. यापुढील काही आठवडे पाकिस्तानसाठी अस्वस्थतेचे असणार आहेत.
दहशतवादाला संपवण्याचा निर्धार
भारताने यावेळी केवळ एक दहशतवादी मारला नाही, तर त्यामागे असलेली भयाचं प्रतिक ही संकल्पनाच उद्ध्वस्त केली आहे. रौफ अजहरचा अंत म्हणजे IC-814 च्या प्रवाशांच्या न्यायाला एक विलंबित, पण ठोस उत्तर आहे. आणि हा केवळ प्रारंभ आहे – भारताच्या नव्या धोरणाचं, नव्या कारवायांचं आणि शांततेच्या नव्या व्याख्येचं.