जर तुमच्याकडे २० रुपयांची नोट आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला असून, लवकरच बाजारात २० रुपयांची नवी नोट सादर केली जाणार आहे. या नव्या नोटेवर आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे. विशेष म्हणजे ही नोट नवीन सीरिजमधील असली, तरी तिचं डिझाईन सध्याच्या नोटेसारखंच असेल. म्हणजेच, नोटेचा मूलभूत स्वरूपात फारसा बदल होणार नाही, मात्र काही नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये आणि अद्ययावत घटक यामध्ये जोडले जातील.
नव्या नोटेचा रंग हिरवट-पिवळसर (greenish-yellow) असेल आणि तिचा आकार ६३ मिमी बाय १२९ मिमी एवढा असेल. या नोटेच्या मागील बाजूस एलोरा लेण्यांचं चित्र छापलेलं असेल, ज्यातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नोटेच्या समोरील आणि मागील बाजूस फुलांच्या डिझाईनमध्ये ‘२०’ छापलेलं असेल, तर ‘RBI’, ‘भारत’, ‘India’, आणि ‘२०’ हे शब्द लहान अक्षरांमध्ये दिसतील. शिवाय, या नोटेवर महात्मा गांधी यांचे चित्र, अशोक स्तंभ, स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आणि भाषा पटल सुद्धा असेल.
जुन्या नोटा वैध राहणार
या नोटेवर आरबीआय गव्हर्नर यांची स्वाक्षरी, हमी मजकूर, आणि आरबीआयचं अधिकृत चिन्ह असणार आहे, जे या नोटेची विश्वासार्हता आणि सुरक्षितता अधोरेखित करतात. महत्त्वाचं म्हणजे, सध्या वापरात असलेल्या २० रुपयांच्या जुन्या नोटा वैध राहणार आहेत. म्हणजेच, नागरिकांनी जुन्या नोटा वापरण्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. नवीन नोट बाजारात आली तरी जुन्या नोटा बंद होणार नाहीत.
आरबीआयच्या या निर्णयामागे उद्दिष्ट आहे की, नागरिकांना जास्त दर्जेदार आणि सुरक्षित चलन उपलब्ध करून द्यावं नव्या नोटांमुळे खोट्या नोटांचा धोका कमी होण्यास मदत होईल आणि यामधून भारताच्या सांस्कृतिक ठेव्याला प्रोत्साहन दिलं जाईल. त्यामुळे, देशातील प्रत्येक नागरिकाने या बदलाची माहिती ठेवणं गरजेचं आहे.
नव्या नोटेची वैशिष्ट्ये काय असतील?
आरबीआयने स्पष्ट केलं आहे की ही नोट नवीन सीरिजमधील असेल, मात्र तिचं डिजाईन सध्याच्या २० रुपयांच्या नोटेसारखंच राहील. फक्त काही लहान बदलांसह आणि नवीन गव्हर्नरच्या स्वाक्षरीसह ती सादर होईल.
रंग: नोटेचा रंग हिरवट-पिवळसर (Greenish-yellow) असेल.
आकार: ही नोट ६३ मिमी x १२९ मिमी आकाराची असेल.
चित्र: नोटेच्या मागील बाजूस एलोरा लेण्यांचे चित्र असणार आहे, ज्यामध्ये भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा झळकणार आहे.
इतर महत्त्वाचे बदल काय असतील?
समोरील व मागील बाजूस फुलांच्या डिझाईनमध्ये २० छापलेलं असेल.
देवनागरी लिपीत ‘२०’, “भारत”, “India”, “RBI” हे शब्द लहान आकारात असतील.
महात्मा गांधींचं चित्र, अशोक स्तंभ, स्वच्छ भारत मिशनचं लोगो आणि भाषा पटल (Language panel) देखील नोटेवर दिसेल.
गव्हर्नरची स्वाक्षरी, हमी मजकूर आणि RBIचं चिन्ह नोटेवर राहील, जे तिला अधिकृतता आणि सुरक्षा देईल.