Real Estate : रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी ; देशातील ‘या’ 7 महत्वाच्या शहरात किती बनली घरे ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Real Estate : सध्या रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रामध्ये तेजी आहे. कोरोना काळात मंदीमुळे अनेक गृहप्रकल्प रखडले होते. त्यांना आता गती मिळत आहे. 2023 मध्ये देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये घरांचे बांधकाम 8 टक्क्यांनी वाढून 4.35 लाख युनिट झाले, तर 2022 मध्ये 4.02 लाख घरे बांधली गेली.

रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्राने पकडला वेग

बांधकामाचा वेग वाढण्याचे कारण म्हणजे चांगली विक्री ज्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांचा कॅश फ्लो सुधारला आहे. देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये घरांचे बांधकाम कोणत्या पद्धतीने पूर्ण झाले आहे ते आता जाणून घेऊया. मुंबई महानगर प्रदेशात 1.43 लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले, म्हणजेच MMR मध्ये गेल्या वर्षी 13 टक्के वाढ झाली, तर 2022 मध्ये ही संख्या 1.26 लाख युनिट होती. तर दिल्ली एनसीआरमध्ये 2023 मध्ये 1.14 लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले, जे 2022 मधील 86 हजार 300 पेक्षा 32 टक्के जास्त आहे.

काय आहे पुण्याची स्थिती? (Real Estate)

मात्र, गेल्या वर्षी पुण्यात ६५ हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले, जे २०२२ मध्ये हा आकडा ८४,२०० होता म्हणजे वर्षभरात ही आकडेवारी २३ टक्क्यांनी घटली आहे. गेल्या वर्षी बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये 87 हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले जे 2022 मध्ये 81 हजार 580 पेक्षा जास्त आहे. कोलकात्यात गेल्या वर्षी 25 हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले जे 2022 मध्ये 23 हजारांपेक्षा जास्त होईल.

तीन वर्षात बांधली दुप्पट घरे

नाइट फ्रँक आणि NAREDCO च्या अहवालांनी देखील बांधकाम क्षेत्रात तेजी (Real Estate) असल्याचे म्हंटले आहे. 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स 59 अंकांवर होता तर तो चौथ्या तिमाहीत 69 अंकांपर्यंत वाढला ही वाढ केवळ एका महिन्यातली आहे अशा परिस्थितीत येत्या काळातही रिअल इस्टेटची तेजी अशीच कायम राहणार असल्याचा दावा केला जात आहे.