Real Estate : घरं झाली अनमोल ! 1 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या घरांना खरेदीदारांची पसंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Real Estate : आपल्याला माहितीच असेल की रिअल इस्टेट आणि हौसींग क्षेत्रातील गुंतवणूक ही सर्वाधिक फायदेशीर गुंतवणुकींपैकी एक समजली जाते. त्यामुळे घरांच्या किमती वाढल्या तरी घरं घेणाऱ्यांची काही कमी नाही. अशीच काहीशी माहिती एका सर्वे मधून समोर आली आहे. यंदाच्या वर्षी पहिल्या तिमाहीतील आकडेवारी पहिली तर ही आकडेवारी आश्चर्यचकीत करणारी आहे. अहवालात मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत घरांची विक्री ९ टक्क्यांनी वाढली असून या कालावधीत तब्बल 86,345 घरांची विक्री (Real Estate) देशातल्या मोठ्या शहरांमध्ये झाली आहे .

महागड्या घरांना पसंती (Real Estate)

महाराष्ट्राचा विचार करता पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती वाढल्या आहेत. पण तरीदेखाली एक कोटींपेक्षा जास्त किमती असलेल्या घरांना खरेदीदारांनी पसंती दर्शवली आहे. 1 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या घरांच्या विक्रीत 51 टक्क्यांची वाढ झालीय. तर दुसऱ्या बाजूला 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या घरांच्या विक्रीत घट झाली असून या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, आठ शहरांमध्ये विक्री झालेल्या 86,345 घरांपैकी 40 टक्के घरं ही 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची आहेत. विक्री झालेल्या एकूण घरांपैकी 34,895 घरांची किंमत ही 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती असं अहवालात सांगण्यात आलं आहे.

यापूर्वीच्या आकडेवारीचा विचार केला तर ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीत (Real Estate) सर्वोच्च घरांची विक्री झाली होती. तर या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत 86,345 घरांची विक्री झाली आहे. ही विक्री गेल्या सहा वर्षातील कोणत्याही तिमाहीतील दुसऱ्या क्रमांकाची विक्री आहे.

घर विक्रीमध्ये मुंबईचा डंका (Real Estate)

मुंबई राज्याची आर्थिक राजधानी आहे. मात्र मोठ्या आठ शहरांच्या यादीत घर घेण्यामध्ये मुबंईला सर्वाधिक पसंती असल्याचे अहवालावरून समजते. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या आठ शहरांमध्येच 86,345 घरांची विक्री झालीय. त्यापैकी, 23,743 घरांची विक्री एकट्या मुंबईत झालीय. ही विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी अधिक आहे. म्हणजे घर विक्रीच्या बाबतीत मुंबई शहर सर्व शहरांपेक्षा आघाडीवर आहे.

तर घरांच्या सर्वाधिक किंमती कोणत्या शहरात आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हैदराबाद या शहरात घरांच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. मागील वर्षीच्या तुलनेत हैदराबादमध्ये घरांच्या किंमतीत 13 टक्यांची वाढ झालीय. देशातल्या आठ मोठ्या शहरांपैकी या शहरात सर्वाधिक महागडी घरे आहेत.

कोणत्या शहरात किती टक्क्यांनी घरे महाग (Real Estate)

मुंबई – 6 टक्क्यांची वाढ
बंगळुरु – 9 टक्क्यांची वाढ
एनसीआर – 5 टक्क्यांची वाढ
कोलकाता – 7 टक्क्यांची वाढ
पुणे – 4 टक्क्यांची वाढ
चेन्नई – 5 टक्क्यांची वाढ