हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Realme 14T 5G – रिअलमीने भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Realme 14T 5G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन दमदार फीचर्ससह येतो आणि बजेट श्रेणीत एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. यामध्ये 6.67 इंच फुलएचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2000 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर वापरण्यात आला आहे, जो 6nm प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित आहे. यासोबत Arm Mali-G57 MC2 GPU देखील मिळतो.
Realme 14T 5G चे फीचर्स –
Realme 14T 5G मध्ये 8GB RAM आणि 128GB व 256GB स्टोरेजचे दोन पर्याय दिले आहेत, आणि मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा ड्युअल सिम स्मार्टफोन Android 15 आधारित Realme UI 6.0 वर काम करतो. फोटोग्राफीसाठी, यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 6000mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसह येतो, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्टीरिओ स्पीकर्स आणि 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ax, Bluetooth 5.3 यांसारखे कनेक्टिव्हिटी फीचर्सही दिले आहेत.
किंमत –
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Realme 14T 5G चा 8GB + 128GB वेरिएंट 17,999 रु मध्ये उपलब्ध आहे, ज्यावर बँक ऑफरनंतर 1,000 रु सवलत मिळून हा फोन 16,999 रु मध्ये मिळू शकतो. तर 8GB + 256GB वेरिएंटची किंमत 19,999 रु आहे, यावर देखील ऑफलाइन खरेदीसाठी 1,000 रु चा बँक डिस्काउंट दिला जाईल. हा स्मार्टफोन 25 एप्रिलपासून दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.




