हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Realme Narzo N65 5G – तुम्ही जर कमी किंमतीत चांगला फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ॲमेझॉनवरील हि डील तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ग्राहकांना Realme Narzo N65 5G स्मार्टफोनवर किंमत सूट, बँक ऑफर्स आणि कूपन ऑफर्स मिळणार आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा , 5000mAh ची बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स उपलब्ध आहेत. तर चला Realme Narzo N65 5G वर मिळणाऱ्या डील्स आणि ऑफर्सविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Realme Narzo N65 5G चे फीचर्स –
Realme Narzo N65 5G मध्ये 6.72 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो . यामध्ये MediaTek Dimensity 6300 6nm चिपसेट वापरण्यात आले आहे. फोन 6GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि अतिरिक्त 6GB वर्च्युअल रॅमसह येतो. यामध्ये 128GB UFS 2.2 स्टोरेज आहे. कॅमेरा सेटअपसाठी, Narzo N65 च्या रिअरमध्ये सॅमसंग JN1 सेंसरसह 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे, जो कमी प्रकाशातही चांगले फोटो आणि परफॉर्मन्स देतो . सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी त्यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. डिझाइनच्या बाबतीत, फोन प्लास्टिक बॅक आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. Narzo N65 मध्ये लाइटवेट आणि एर्गोनोमिक बिल्ड असून, IP54 रेटिंगसह तो धूळ आणि पाण्यापासून वाचवतो.
किंमत अन् ऑफर्स –
Realme Narzo N65 5G हा फोन 11,499 रुपये किमतीत लाँच झाला होता. पण आता ग्राहकांना हा स्मार्टफोन ॲमेझॉनवर स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. Realme Narzo N65 5G चा 4GB+128GB वेरियंट 10,499 रुपये किमतीत लिस्ट केला आहे, कूपन ऑफरच्या माध्यमातून 1,000 रुपये बचत होऊ शकते. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, Federal Bank क्रेडिट कार्डवर 7.5% (1000 रुपये) डिस्काउंट मिळू शकतो, त्यामुळे हा फोन 8,711 रुपयांना उपलब्ध होणार आहे.