Red Radish : पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळा गुणकारी; पोटाच्या समस्या करतो छूमंतर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Red Radish) हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि मुळा मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. त्यामुळे या दिवसांत घराघरांत गाजर मुळ्याची कोशिंबीर, पराठे आणि सॅलड बनवले जाते. अनेक लोक आवडीने गाजर खातात. मात्र मुळा खायला नाक मुरडतात. आता हिवाळ्याचे दिवस सरू लागले आहेत. अशा काळात मुळा खाणे अत्यंत आवश्यक असते. आपण अनेकदा पांढरा मुळा पाहिला असेल, खाल्लासुद्धा असेल. पण पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळा खाणे जास्त आरोग्यदायी मानले जाते.

लाल मुळा दिसायला आकर्षक आणि पांढऱ्या मूल्यापेक्षा चवीला चांगला असतो. लाल रंग आणि हलकी गोड चव असल्यामुळे लहान मुलेदेखील लाल मुळा खाणे पसंत करतात. (Red Radish) लाल मुळ्यामध्ये अनेक गुणकारी घटक असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे केवळ हिवाळ्यात नव्हे तर इतर ऋतूंमध्येसुद्धा मुळा खाणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. अगदी पोटाच्या समस्यांपासून ते त्वचेच्या आरोग्यासाठी मुळा लाभकारी ठरतो. चला तर जाणून घेऊया लाल मुळ्यातील गुणकारी घटक आणि लाल मुळा खाण्याचे फायदे.

गुणकारी लाल मुळा (Red Radish)

सामान्यपणे पांढरा मुळा हा अनेक लोक आहारात घेतात. मात्र लाल मुळ्याविषयी फार कमी माहिती असल्याने तो खातेवेळी अनेकदा विचार केला जातो. मात्र पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळा खाणे अत्यंत फायदेशीर आहे. कारण लाल मुळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सची पातळी पांढऱ्या मुळ्याच्या तुलनेत ८० ते १०० टक्के जास्त असते.

(Red Radish) लाल मुळ्यामध्ये अँथोसायनिन, फिनोलिक्स, फायबर यासह कंजेस्टिव्ह गुणधर्म असतात. तसेच लाल मुळ्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे ए, सी, ई, बी 6 आणि इतर खनिजेदेखील असतात. त्यामुळे विविध प्रकारे लाल मुळा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

लाल मुळा खाण्याचे फायदे (Red Radish Benefits)

1. रोग प्रतिकारशक्तीत वाढ – लाल मुळ्यामुळे मोठ्या प्रमाणात अँटि ऑक्सिडंट्स आणि अँथो सायनिन्सन असतात. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी सक्रिय होतात. परिणामी शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास सहाय्य मिळते.

2. यकृताची कार्य दुरुस्ती – लाल मुळा हा पांढऱ्या मुळ्यापेक्षा अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो. कारण यामध्ये केवळ अँटिऑक्सिडेंटच असतात. (Red Radish) शिवाय यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्याची आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्याची क्षमता असते. लाल मुळा हा यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यकृताचे कार्य दुरुस्त करण्यासाठी आणि कावीळच्या लक्षणांना तोंड देण्यासाठी लाल मुळा फायदेशीर ठरतो.

3. पोटाच्या समस्यांवर गुणकारी – लाल मुळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोटाच्या समस्यांवर लाल मुळ्याचे सेवन लाभदायी आहे. मुळ्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. कारण लाल मुळ्यातील फायबर हे आतड्यांची हालचाल सुरळीत करण्यासाठी मदत करते. यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या त्रास देत नाहीत.

4. रक्तदाबाच्या समस्येवर फादेशीर – लाल मुळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे आपल्या शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन राखण्यासाठी लाल मुळा अधिक लाभदायी ठरतो. (Red Radish) लाल मुळ्यातील हायपरटेन्सिव्ह गुणधर्म हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात आणि इतर ऋतूंमध्ये देखील लाल मुळ्याचे सेवन आवर्जून केल्यास रक्तदाबाच्या समस्येवर आराम मिळतो. मात्र जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर डॉक्टरांचा सल्ला आधी घ्या.

5. शारीरिक वेदनांवर परिणामकारक – लाल मुळ्यात अँथोसायनिन मोठ्या प्रमाणात आढळते. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होते. तसेच लाल मुळ्यात फिनोलिक्सदेखील असतात. जे शारीरिक सूज आणि वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

6. सर्दीशी दोन हात – लाल मुळ्यामध्ये कंजेस्टिव्ह गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. (Red Radish) त्यामुळे घशातील श्लेष्मा साफ करण्यासाठी लाल मुळ्याचे सेवन फायदेशीर ठरते. सामान्य सर्दीवर इलाज नसला तरीही हिवाळी सर्दीवर लाल मुळ्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. सर्दीवर लाल मुळ्याचा रस काही काळ आराम देऊ शकतो.

7. वाढत्या वजनावर नियंत्रण – लाल मुळ्यामध्ये चरबीचा समावेश नसतो. तसेच लाल मुळ्यात मर्यादित कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स असतात. जे शरीराचे वजन वाढू देत नाही. त्यामुळे जर वाढत्या वजनावर नियंत्रण करायचे असेल तर लाल मुळा खाणे कधीही फायदेशीर. मात्र, रात्रीच्या जेवणात लाल मुळ्याचे सेवन करू नये. यामुळे पित्त वा कफचा त्रास होऊ शकतो.

8. चमकदार त्वचा – लाल मुळा हा त्वचेच्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. कारण लाल मुळ्यात फॉस्फरस आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. मुळा शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करतो. परिणामी त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि मुरूम, पुरळ यापासून मुक्तता मिळते. (Red Radish)