Redmi A5: Redmi A5 भारतात लाँच; फक्त 6,499 रुपयांमध्ये उपलब्ध

Redmi A5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Redmi A5 – रेडमीने भारतात आपला नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Redmi A5 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन अधिकृतपणे सादर करण्यात आला असून, कमी किंमतीत चांगले फीचर्स देणारा हा फोन बजेट ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आला आहे. Redmi A5 मध्ये 6.88 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. तसेच, हा डिस्प्ले TÜV Rheinland सर्टिफिकेशनसह येतो, जो डोळ्यांचे संरक्षण करतो. तर चला या स्मार्टफोन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Redmi A5 चे फीचर्स –

Redmi A5 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T7250 प्रोसेसर देण्यात आला आहे आणि Android 15 (Go Edition) वर चालतो. फोनमध्ये 3GB आणि 4GB रॅमचे दोन पर्याय असून, अनुक्रमे 64GB आणि 128GB स्टोरेज मिळते. या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 2TB पर्यंत वाढवता येते. शिवाय, वर्चुअल रॅमच्या सहाय्याने रॅम 8GB पर्यंत वाढवता येते.

या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकंडरी सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. Redmi A5 मध्ये 5200mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली असून ती 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचे डाइमेंशन्स 171.7 x 77.8 x 8.26 मिमी असून वजन 193 ग्रॅम आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी Redmi A5 मध्ये Wi-Fi, Bluetooth, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. या डिव्हाइसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर व AI-आधारित फेस अनलॉक सपोर्टही दिला आहे. हा फोन P52 रेटिंगसह येतो, म्हणजेच तो हलक्या पाण्याच्या स्रावापासून सुरक्षित आहे.

किंमत –

Redmi A5 ची 3GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,499 आहे, तर 4GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट 7,499 रु मध्ये मिळतो. हा स्मार्टफोन Jaisalmer Gold, Black आणि Pondicherry Blue या तीन रंगांत उपलब्ध असून, तो 16 एप्रिलपासून दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart आणि शाओमी इंडिया वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.