Reduce Electricity Bill : उन्हाळ्यात लाईट बिल जास्त येतं? ‘या’ टिप्स फॉलो कराल तर विजेसह होईल पैशांची बचत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reduce Electricity Bill) मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये कोणताही ऋतू असला तरी गरमी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. २४ तास उकाडा जाणवतो. अशातच आता थंडीचे दिवस सरून उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे साहजिकच वातावरणातील उष्णता आणखीच वाढली आहे. या दिवसांमध्ये घराघरात अख्खा दिवस आणि रात्र पंखे, एसी, कुलर सुरु असतात. तरीही अंगाची लाही काही कमी होत नाही. फ्रिजमध्ये थंड पेय भरून ठेवली जातात. अशा विविध प्रकारे गरमीपासून थोडा आराम मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो.

अनेक घरांमध्ये गरमीचा ताप कमी करण्यासाठी एअर कंडिशनर, पंखे, कुलर सारख्या विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण यामुळे विजेचा वापर वाढतो आणि परिणामी वीज बिलाचा आकडा वाढतो. (Reduce Electricity Bill) सर्व सामान्यांसाठी हा वाढलेल्या बिलाचा आकडा खिशाला कात्री लावणारा असतो. तुमच्याही बाबतीत असं होतं असेल तर आज आम्ही ज्या टिप्स देणार आहोत त्यांचा आवर्जून वापर करा. म्हणजे महिन्याच्या येणाऱ्या बिळात जी वाढ होते तिच्यावर आळा घालता येईल. काही सोप्या गोष्टींची काळजी घेतली तर हे करणे अगदी सोपे आहे. त्यासाठी काय करायचे हे जाणून घेऊया.

LED बल्बचा वापर करा (Reduce Electricity Bill)

अनेक लोकांच्या घरात ट्रेडिशनल बल्ब वा दिवे असतात. असे बल्प मोठ्या प्रमाणात वीज ओढून घेतात. याच्या तुलनेत एलईडी लाईट बल्ब मात्र कमी विजेत चांगला प्रकाश देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विजेची बचत करता येते आणि परिणामी तुमचे लाईट बिल कमी येते. त्यामुळे घरात ट्रॅडिशनल बल्बऐवजी एलईडी लाईट बल्बचा वापर करावा.

आठवणीने स्विच बंद करा

अनेकदा आपण आपल्याच गडबडीत बऱ्याच गोष्टी विसरून जातो. शिवाय काही लोकांना घरातून किंवा रूममधून बाहेर पडताना लाईट, पंखे, एसी सुरु ठेऊन जाण्याची सवय असते. (Reduce Electricity Bill) जर तुम्हालाही ही सवय असेल तर साहजिक आहे तुमचं लाईटबील वाढणार. त्यामुळे आपले काम संपल्यानंतर आठवणीने खोलीच्या बाहेर पडताना लाईट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे स्विच बंद करा. केवळ लाईट पंखे नव्हे तर फोनचे चार्जर, लॅपटॉप किंवा इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर होत नसताना त्यांचे स्विच आठवणीने बंद करा.

मोबाईल चार्जर आणि पीसी काम नसेल तर बंद करा

आजकाल बरेच लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशावेळी, आपण पीसीवरील काम संपल्यानंतर स्वीच बंद करायला विसरतो. अनेकदा लॅपटॉपवर काम करताना चार्जिंग केबलचा स्विच सुरूच असतो. (Reduce Electricity Bill) तर लक्षात घ्या की, पीसीवर काम केल्यानंतर नेहमी पावर स्विच ऑफ करा आणि तसेच मोबाईल चार्जरचे काम संपल्यावर आठवणीने स्विच बंद करा. शिवाय पीसी स्टॅन्ड बाय मोडवर ठेवू नये. यामुळे देखील वीजबिल वाढण्याची शक्यता असते.

5 स्टार रेटेड रेफ्रिजरेटर

जर तुमच्या घरात जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या लगेच बदलून घ्या किंवा अपग्रेड करून घ्या. यामुळे तुमच्या वीजबिलात मोठा फरक पडेल. जर तुम्ही वापरत असलेला रेफ्रिजरेटर साधारणऐवजी ५ स्टार रेटेड असेल तर तुम्ही ३० टक्क्यांनी वीज बिलात बचत करू शकता. मात्र जर तुम्ही जुना किंवा कालबाह्य रेफ्रिजरेटर वापरत असाल तर यामुळे तुमच्या बिलाचा आकडा मोठा होऊ शकतो. असे फ्रिज कुलिंगसाठी जास्त वीज ओढतात आणि यामुळे वीजबिलात वाढ होते.

AC ची सेटिंग बदला

उन्हाळ्याच्या दिवसात गरमी इतकी जास्त असते की दिवसभर पंखे, कुलर, एसीचा वापर केला जातो. त्यामुळे साहजिकपणे विज बिल जास्त येते. यासाठी एसीच्या सेटिंगमध्ये काही महत्वाचे बदल करून घ्या. जसे की, एसी हा २४ डिग्रीवर सुरू ठेवा. यामुळे तो वेळोवेळी ऑफ होत राहतो आणि यामुळे वीज बिलाचा आकडा कमी होतो. (Reduce Electricity Bill)