Reliance Industry : रिलायन्स कंपनीची ऐतिहासिक कामगिरी; शेअर्सने ओलांडली 20 कोटींची विक्रमी पातळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reliance Industry) देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये रिलायन्स कंपनीचे मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश आहे. ते कायमचं उद्योग विस्ताराच्या दिशेकडे एक एक पाऊल पुढे सर करताना दिसतात. अंबानींच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर हे कायम तेजीत असतात. अशातच मंगळवारी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी रिलायन्स कंपनीच्या शेअर्समध्ये १ टक्क्याने वाढ झाल्याचे समोर आले आहे. यानुसार आता रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर्स २,९५७ रुपयांवर गेले आहेत. ही या शेअर्सची मार्केटमधील सर्वोच्च पातळी आहे.

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर वाढीचे परिणाम (Reliance Industry)

एकूण ५२ आठवड्यांचा उच्चांक असलेले हे शेअर्स आतापर्यंत २०२४ मध्ये १४ टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज तब्बल २० लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

(Reliance Industry) आज १३ फेब्रुवारी रोजी बीएसईवर हा शेअर इंट्राडे १.८ टक्क्यांनी वाढला. त्याआधी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हे शेअर्स १.३० टक्के वाढीसह २,९४० रुपयांवर होते. पुढे या शेअर्सने २,९५७ रुपयांचा नवा उच्चांक गाठल्याचे दिसून आले. ज्यामुळे रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर वाढीसोबत अर्थातच कंपनीच्या बाजार भावातही (Market Value) मोठी वाढ झाली आहे.

इतर कंपन्यांपेक्षा एक पाऊल पुढे

जानेवारी २०२४ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा हा शेअर्स १०.४ टक्क्यांनी वाढला होता. तर फेब्रुवारीमध्ये आणखी ४ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता रिलायन्स इंडस्ट्रीज २० लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणारी भारतातील पहिली आणि सर्वात महत्वाची कंपनी ठरली आहे.

एका वृत्तातील रिपोर्टनुसार, आत्ताच्या परिस्थितीत टीसीएस – १५ लाख कोटी रुपये, एचडीएफसी बँक – १०.५ लाख कोटी रुपये, आयसीआयसीआय बँक – ७ लाख कोटी रुपये आणि इन्फोसिस – ७ लाख कोटी रुपये असे या कंपन्यांचे बाजार भांडवल आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी बाजार भांडवलात या कंपन्यांच्या एक पाऊल पुढे आहे.

स्टॉक मार्केटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची मोठी उसळी

एका वृत्तानुसार, ऑगस्ट २००५ साली मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (RIL) बाजार भांडवल एकूण १ लाख कोटी रुपये इतके होते. तर याच वर्षात एप्रिल २००७ मध्ये २ लाख कोटी रुपये आणि पुढे सप्टेंबर २००७ मध्ये ३ लाख कोटी रुपये इतके झाले. पुढे ऑक्टोबर २००७ मध्ये बाजार भांडवलात आणखी १ लाख कोटी रुपयांची वाढ करून ४ लाख कोटी रुपये इतके करण्यात आले. (Reliance Industry)

ऑक्टोबर २००७ पासून जुलै २०१७ पर्यंत बाजार भांडवलाची किंमत ५ लाख कोटी रुपये करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजला १२ वर्षांचा काळ पहावा लागला. मात्र त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये १० लाख कोटी तर सप्टेंबर २०२१ मध्ये १५ लाख कोटींवर भांडवलाची किंमत पोहोचली. यानंतर केवळ ६०० दिवसांत रिलायंस इंडस्ट्रीजने २० लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला.