Renault Triber Discount Offer : या 7 सीटर कारवर मिळतोय 63,000 रुपयांपर्यंत डिस्कॉउंट

Renault Triber Discount Offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Renault Triber Discount Offer – भारतीय ग्राहकांसाठी स्वस्त आणि परवडणारी 7-सीटर कार शोधत असाल, तर रेनॉल्ट ट्रायबर तुम्हाला चांगला पर्याय ठरू शकतो. सध्या रेनॉल्टने आपल्या MY24 आणि MY25 ट्रायबर मॉडेल्सवर मोठ्या डिस्काउंटची (Renault Triber Discount Offer) घोषणा केली आहे. या ऑफरमुळे खरेदीदारांना 43,000 ते 63,000 रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. ही ऑफर 31 जानेवारी 2025 पर्यंत ग्राहकांना मिळणार आहे. तरी लवकरात लवकर या संधीचा फायदा ग्राहकांनी घ्यावा. तर चला या डिस्काउंटबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

MY24 Renault Triber वरील ऑफर्स (Renault Triber Discount Offer) –

MY24 Renault Triber मॉडेलवर ग्राहकांना एकूण 63,000 रुपयांची आकर्षक सूट मिळणार आहे. या सूटमध्ये विविध प्रकारच्या ऑफर्सचा समावेश आहे, ज्यात कॅश डिस्काउंट 30,000 रुपये, एक्सचेंज बोनस 15,000 रुपये, लॉयल्टी बोनस 10,000 रुपये, आणि कॉर्पोरेट बोनस 8,000 रुपये समाविष्ट आहेत. ही ऑफर Triber च्या सर्व व्हेरिएंट्सवर लागू आहे, मात्र बेस व्हेरिएंट RXE साठी फक्त लॉयल्टी बोनस उपलब्ध आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना त्यांच्या गाडीच्या खरेदीवर चांगली बचत होऊ शकते

MY25 Renault Triber वर आकर्षक सूट –

MY25 Renault Triber मॉडेलवर 43,000 रुपयांची आकर्षक सूट उपलब्ध आहे. या डिस्काउंटमध्ये 10,000 रुपये कॅश डिस्काउंट, 10,000 रुपये लॉयल्टी बोनस, आणि 8,000 रुपये कॉर्पोरेट बोनस यांचा समावेश आहे. या सर्व डिस्काउंट्स सर्व व्हेरिएंट्ससाठी लागू आहेत, परंतु RXE व्हेरिएंटवर फक्त लॉयल्टी बोनस दिला जात आहे. या ऑफरमुळे पैशाची बचत होते.

रेनॉल्ट ट्रायबर –

रेनॉल्ट ट्रायबर ही बजेट-फ्रेंडली MPV आहे. या कारमध्ये 7 सीट्स असून 1.0-लिटर 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 72PS पॉवर आणि 96Nm टॉर्क निर्माण करते. कारमध्ये ड्युअल टोन इंटीरियर्स, 8-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, एसी व्हेंट्स, चार एअरबॅग्स, आणि 625 लीटरचे मोठे बूट स्पेससारखी फीचर्स आहेत.

आधुनिक फीचर्स –

(Renault Triber Discount Offer) कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आलेली आहेत. यामध्ये प्रोजेक्टर हॅलोजन हेडलाइट्स आणि हॅलोजन टेल लाईट्स समाविष्ट आहेत. केबिनमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (RXT व्हेरिएंट), 7-इंचचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले (RXZ) आणि वायरलेस फोन चार्जर (RXZ) सारखे प्रगत तंत्रज्ञान आहे. तसेच, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स (RXT व्हेरिएंटमध्ये), इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल सीट्स आणि पुश बटण स्टार्ट-स्टॉप (RXJ) सारख्या आरामदायक आणि उपयोगी फीचर्सचा समावेश आहे, ज्यामुळे गाडीचा अनुभव आणखी सोयीस्कर आणि आधुनिक बनतो. जर तुम्ही कुटुंबासाठी स्वस्त आणि मस्त 7-सीटर कार शोधत असाल, तर ही ऑफर तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

हे पण वाचा : स्वस्तात मिळतोय iPhone 14; Flipkart वर छप्परफाड ऑफर