हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Republic Day Sale 2025 – प्रत्येकवर्षी भारतातील प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेल्स लावत असतात. यंदाही ॲमेझॉन (Amazon Great Republic Day Sale) आणि फ्लिपकार्ट (Flipkart Monumental Sale) प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्या रिपब्लिक डे सेल्सची घोषणा केली आहे. या सेल्समध्ये विविध उत्पादने मोठ्या सवलतीत उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षक संधी मिळणार आहे. तर चला या सेल्सबदल अधिक माहिती पाहुयात.
ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल (Republic Day Sale 2025) –
ॲमेझॉनच्या ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ (Amazon Great Republic Day Sale) ची सुरुवात 13 जानेवारीपासून नॉन-प्राइम युजर्ससाठी आणि 12 जानेवारीपासून प्राइम युजर्ससाठी झाली आहे. या सेलमध्ये Apple, iQOO, OnePlus, Samsung, Xiaomi सारख्या प्रमुख स्मार्टफोन ब्रॅण्ड्सवर 40% पर्यंत सूट दिली जात आहे. त्याचबरोबर, नवे लाँच झालेले स्मार्टफोन्स जसे की OnePlus 13, iPhone 15, Galaxy M35 यावरही आकर्षक सवलती उपलब्ध असणार आहेत. स्मार्ट टीव्ही, गृहोपयोगी उपकरणे आणि प्रोजेक्टरवर 65% पर्यंत सूट मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की इयरफोन, स्मार्ट वॉच, आणि माउस हे 199 रुपयांपासून सुरू होणार आहेत. विशेषतः, अलेक्सा आणि फायर टीव्ही उत्पादने 2599 रुपयांमध्ये उपलब्ध होतील. या सर्व ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ॲमेझॉनवरील (Republic Day Sale 2025) या सेलला नक्कीच भेट देणं आवश्यक आहे.
फ्लिपकार्ट मोन्युमेंटल सेल (Flipkart Monumental Sale) –
फ्लिपकार्टने ‘मोन्युमेंटल सेल’ (Flipkart Monumental Sale) ची घोषणा 14 जानेवारीपासून केली आहे, ज्यामध्ये Flipkart Plus सदस्यांना 13 जानेवारीपासून प्रवेश मिळणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळणार आहे. उदाहरणार्थ, iPhone 16 63,999 रुपयांना उपलब्ध होईल, जो सध्या 74,900 रुपयांच्या विक्री किमतीपेक्षा कमी आहे. तसेच, Samsung Galaxy S24 Plus 59,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल, तर Apple iPad 1st Gen 27,999 रुपयांना मिळणार आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड वापरून खरेदी करणाऱ्यांना 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय, स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, टीव्ही, टॅबलेट्स आणि घरगुती उपकरणांवर देखील मोठ्या सवलती मिळणार आहेत. रिपब्लिक डे सेल्समधील (Republic Day Sale 2025)या खास ऑफर्समुळे ग्राहकांना विविध आवश्यक वस्तू खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
हे पण वाचा : ग्राहकांसाठी खुशखबर !! Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट