Riteish Deshmukh : ‘धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड..’; रितेश देशमुखने केली नव्या चित्रपटाची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Riteish Deshmukh) मराठी तसेच बॉलीवूड सिनेविश्वातील लाडका अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर कायम सक्रिय दिसतो. अनेकदा तो विविध पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. रितेश देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. चाहत्यांनीसुद्धा या चित्रपटाला पसंती दिली. तसेच या चित्रपटासाठी रितेशला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यानंतर आता रितेशने त्याच्या नव्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्याने आगामी ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती साजरी केली जात आहे. दरम्यान अभिनेता रितेश देशमुखने अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवरून त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. (Riteish Deshmukh) रितेशने रविवारी एक पोस्ट शेअर करत ‘युद्ध धर्म, धर्म युद्ध’ असं म्हटलं होतं. त्यानंतर रितेश काहीतरी मोठी घोषणा करणार अशी कुणकुण लागली होती. अखेर आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर रितेशने पोस्ट शेअर करत आगामी चित्रपट ‘राजा शिवाजी’ची घोषणा केली. या चित्रपटाचे एक पोस्टरही त्याने शेअर केले आहे.

हे पोस्टर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. (Riteish Deshmukh) एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज… फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून… प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे’.

(Riteish Deshmukh)’शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्यानं एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’.’

या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख करणार असून निर्मिती जिनेलिया देशमुख आणि सहनिर्मिती ज्योती देशपांडे करणार आहेत. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये रितेश देशमुख काम करणार की नाही? हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (Riteish Deshmukh) त्यामुळे या आगामी चित्रपटात कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागणार? याविषयी चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हिंदी आणि मराठी अशा दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाला अजय आणि अतुल यांच्या संगीताची जोड लाभणार आहे.