लातूरमध्ये धक्कादायक निकाल ! धीरज देशमुख यांचा पराभव ; रितेशची ‘ती’ सभा कारण असल्याची चर्चा

latur result
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाराष्ट्रातील लातूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आश्चर्यकारक निकाल लागल्याचा दिसून येत आहे. माजी मंत्री कै. विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र धीरज देशमुख आणि अमित देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते. या दोन्ही जागा म्हणजे कन्फर्म जागा असं मानलं जात होतं. मात्र तिथेच जनतेने गणित बिघडलेलं असून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांचा पराभव झालाय. त्यांच्या विरोधात उभे असलेल्या भाजपचे रमेश कराड यांचा विजयी झाला आहे.

धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांच्या निवडणुकी संदर्भातला प्रचार आणि प्रचार सभा चांगल्या रंगल्या होत्या. त्यापैकी एका सभेला स्वतः त्यांचे बंधू अभिनेता रितेश देशमुख यांनी हजेरी लावत जोरदार भाषण ठोकलं होतं. आणि त्यांची हीच सभा निवडणुकीचा निकाल पलटवणारे ठरली तर नाही ना? अशा चर्चा आता रंगू लागल्यात

कारण रितेशने भाषणात मांडलेले मुद्दे चांगलेच गाजले होते. एवढेच नाही तर रितेशच्या भाषणातील मुद्द्यांवरून त्याला सोशल मीडियावरून ट्रॉलही करण्यात येत होते. या सभेत धर्मावरून त्यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं होतं. इतकं करूनही धीरज देशमुख यांचा लातूर ग्रामीणमध्ये पराभव झालाय. धीरज भैय्याच्या पराभवासाठी ती सभा कारणीभूत ठरली की काय? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

नक्की काय होते रितेशच्या भाषणात?

अभिनेता रितेश देशमुखने आपल्या भाषणात म्हटले की, ‘‘आज सगळे पक्ष म्हणतात की धर्म धोक्यात आहे, धर्माला वाचवा.’’ पण खरं तर ते धर्मालाच प्रार्थना करत आहेत की त्यांना या निवडणुकीत वाचवावे. धर्म प्रत्येकाला प्रिय आहे. धर्माचे आचरण प्रत्येक जण करतो. पण धर्माच्या नावाने बोलणाऱ्यांना विचारा आमच्या कामाचं काय झालं? “धर्माचे आम्ही पाहून घेतो, तुम्ही आमच्या पिकांच्या भावाचे सांगा, धर्माचे आम्ही पाहून घेतो तुम्ही आमच्या आया-बहिणींच्या सुरक्षितेचे सांगा” असे विचारा, असे आवाहन रितेशने आपल्या भाषणात केले. निवडणूक काळात बऱ्याचशा, भुलथापा येतील, अफवा येतील, गाफिल राहू नका असे आवाहनही रितेशने केले होते.

अभिनेता रितेश देशमुखचा भाऊ अमित देशमुख येथून निवडणूक लढवत आहे. अमित सध्या 8560 मतांनी पुढे आहेत. भाजपच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर लातूर ग्रामीण विधानसभेच्या जागेवर रितेश देशमुखचा दुसरा भाऊ धीरज देशमुख पिछाडीवर आहे. येथे भाजपचे रमेश काशीराम कराड 1785 मतांनी पुढे आहेत.