Road Accident : विचित्र अपघात!! भरधाव गाडीने सलग चौघांना उडवले; काळजात धस्स करणारा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Road Accident) सोशल मीडियावर कायम अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून अंगावर काटा येतो. वाहतुकीचे नियम न पाळणे, वेगाने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे अशा अनेक कारणांमुळे रस्त्यांवर अपघात होताना दिसतात. एका अपघातामुळे एखादं कुटुंब क्षणात उध्वस्त होतं. अशीच आणखी एक अपघाताची घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रचंड हृदयद्रावक आहे. या व्हिडिओत एका भरधाव गाडीने सलग चौघांना उडवले आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत आपण पाहू शकता की, फुटपाथवरील एका बस स्टॅण्डवर काही लोक उभे आहेत. तर काही लोक आरामात चालत येत आहेत. इतक्यात एक भरधाव कार थेट फुटपाथवर चढते आणि त्यावरून चालणाऱ्या काही लोकांना थेट उडवून पुढे निघून जाते. (Road Accident) यावेळी कारची धडक इतकी जोरदार होती की, धक्का लागलेले लोक अक्षरश: हवेत उडून खाली पडताना दिसत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, या धडकेत चारही लोकांचा मृत्यू झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद घटना (Road Accident)

या दुर्घटनेच्या वेळी फुटपाथवर चालणाऱ्या लोकांनी आपल्या समोर येणारी भरधाव वेगातील गाडी पाहिली. मात्र काही करण्याआधीच ती कार त्यांना उडवून निघून गेली. या अपघाताचा हा धक्कादायक व्हिडीओ फुटपाथवरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या अपघाताची ही दुर्घटना नेमकी कुठली घडली? याबाबत काही माहिती मिळालेली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

या भीषण अपघाताचा व्हिडीओ X हॅण्डल klip_ent नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. (Road Accident) यावर अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलंय, ‘हा एक भयानक अपघात आहे. अपघातात बळी पडलेले नक्कीच मरण पावले असतील’. तर आणखी एकाने म्हटले, ‘निळ्या रंगाच्या टीशर्टमधील माणूस या पृथ्वीवरील सगळ्यात भाग्यवान व्यक्ती आहे’. तर काहींनी हा व्हिडीओ चायना मधला असल्याचे म्हटले आहे.